प्रतिष्ठा न्यूज

बळीराजा गृहउद्योग संस्थेच्या संचालिका डॉ.सत्यभामा जाधव यांना “मराठा उद्योगरत्न पुरस्कार” प्रदान

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य व मराठा उद्योजक कक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा “मराठा उद्योगरत्न पुरस्कार” नांदेड येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा बळीराजा गृहउद्योग संस्थेच्या संचालिका डॉ. सत्यभामा सतीशकुमार जाधव यांना जाहीर झाला होता. तो पुरस्कार दि.9 एप्रिल 2023 रोजी नाशिक येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक येथील मराठा उद्योजक महाअधिवेशनात मराठा सेवा संघाचे संस्थापक- अध्यक्ष तथा इंजिनिअर पुरुषोत्तमजी खेडेकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिवश्री इंजि. विशाल देसले (जिल्हाध्यक्ष), शिवश्री अॅड. माधव मुधाळे (उपाध्यक्ष), शिवश्री सीए. उल्हारा बोरसे (सरचिटणीस), शिवश्री उमेश शिंदे (कार्याध्यक्ष), शिवजी सीए. सुनिल धुले (कोषाध्यक्ष), शिव मनोज आमले (सहसचिव), शिवधी इंजि. विजय पाटील (संघटक), शिवश्री संतोष सिरसाट (सह-संघटक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाशिक येथील “मराठा उद्योगरत्न पुरस्कार” मिळाल्या बद्दल डॉ. सत्यभामा सतीशकुमार जाधव यांचे नांदेड येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवश्री- कामाजीराव पवार, मधुकरराव देशमुख, इंजि शे.रा.पाटील, शिवाजीराव खुडे, प्रा.डॉ.पंजाब चव्हाण, इंजि. सुदेश देशमुख, डॉ. सोपानराव क्षिरसागर, चांदोजी सुर्यवंशी, भगवान कदम, सुभाष कोल्हे पाटील, सरस्वती धोपटे, डॉ.भारती मढवई, प्रा.संतोष देवराये, व्यंकटराव जाधव, शिवाजी पाटील आलेगावकर, संकेत पाटील, उद्धव सुर्यवंशी, नानाराव कल्याणकर, सतीश जाधव, रमेश पवार, पी.के. कदम, पंडित कदम, पंडीत पवळे, पवन सिरसाट, जे.डी. कदम, प्रल्हाद दुरपडे, बळीराम फाजगे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष – डॉ. विद्या पाटील, अरूणा पाटील, परमेश्वर पाटील, वसंत सिरसाट, बालाजी सिरसाट, प्रदीप गुबरे, सतीश धुमाळ, चंद्रशेखर कदम, इंजि प्रवीण जाधव, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.