प्रतिष्ठा न्यूज

तासगाव काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेसच्या वतीने आज तासगाव शहरातून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी ज्यांनी बलिदान व  योगदान दिले,त्या सर्वांचे स्मरण करणे व देशनिर्मितीच्या इतिहासाचे चिंतन करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.यावेळी माजी मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील,  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत,जितेश कदम तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील उपस्थित होते. ही पदयात्रा गुरुवार पेठ,गणपती मंदिर,पागा गल्ली,शिंदे गल्ली,भारती शाळा,  कोकणे कॉर्नर,सिद्धेश्वर चौक,  नगरपालिका,सोमवार पेठ,शिंपी गल्ली,माळी गल्ली,उर्दू शाळा मुस्लिम मोहल्ला,बागवान चौक,बस स्थानक चौक,शिवतीर्थ,काँग्रेस भवन येथे समारोप करून तेथे सभा झाली. पदयात्रेच्या सुरुवातीला असणारे  हलगी वादन,आजादी गौरव  पदयात्रासाठी खास बनवण्यात आलेला जरा याद करो कुर्बानी शीर्षक असणारा रथ,भारतीय स्वातंत्र्याचा वंदे मातरमचा इन्कलाब जिंदाबाद चा जयघोष करणाऱ्या घोषणा,व तिरंगा ध्वज यामुळे भर पावसात लोकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी बोलताना डाँ.विश्वजीत कदम म्हणाले गेली पन्नास वर्षे ज्यांनी स्वताच्या कार्यालयात देशाचा झेंडा लावला नाही असे संघाचे लोक आता घरोघरी झेंडा लावा असे सांगत आहेत.केंद्र शासनाकडून जुलमी अन्याय सुरू आहे.सध्या लोकशाही संपून हुकुमशाहीस सूरवात होत असून आज जाती जाती मध्ये तेड निर्माण करण्याच काम केलं जात असल्याची टीका माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी आझादी गौरव पदयात्रेत केंद्र शासनावर केली.त्याचबरोबर तुम्ही ठिणगी टाका त्याच्या वनवा पेटवण्याचे काम मी करतो अशा शब्दात तासगाव नगरपालिकेच्या अनुषंगाने बोलताना पूर्ण ताकतीने काँग्रेस लढेल याची संकेत त्यांनी यावेळी दिले.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील,माजी नगराध्यक्ष अजय पवार,तालुका उपाध्यक्ष संताजी बापू पाटील,युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील,बेंद्रीचे सरपंच विकास पाटील,सांगली जिल्हा सोशल मीडिया चे प्रमुख अमित पारेकर,डॉक्टर विवेक गुरव,विशाल चंदुरकर  व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.