प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे सावळसिद्ध विकास सोसायटीच्या वतीने सभासदांना मोफत केशर आंब्याची रोपे वाटप

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी दि. 11 : सावळज ता. तासगाव येथील सावळसिद्ध विकास सोसायटीच्या वतीने संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सभासदांना वृक्षारोपण करण्यासाठी  केशर जातीच्या आंब्याची रोपे भेट म्हणून देण्यात आली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आप्पासो कत्ते यांच्या हस्ते रोपाचे वाटप करण्यात आले.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने  सभासदांना वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सावळसिद्ध विकास सोसायटी ही यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने सोसायटीचे संचालक मंडळ नाविन्यपूर्ण असे विविध उपक्रम राबवत आहे. प्रत्येक उपक्रमास सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 यावेळी संस्थेचे चेअरमन मा.दत्तात्रय पाटील व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, मा. चेअरमन श्री ऋषिकेश बिरणे, संचालक प्रशांत कुलकर्णी,संदीप माळी, विनायक पवार, विलास तोडकर राजेंद्र वांडरे, विजय पाटील, शिवाजी पाटील,बाळासो निकम, राजेंद्र सावळजकर,, बंडू पाटील, विनेश पोळ, शिवाजी बुधवले व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.