प्रतिष्ठा न्यूज

चिंतामणनगरचा पुल पूर्ण क्षमतेने सूरु झाल्याशिवाय पंचशीलनगरच्या पुलाचे काम सुरु करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल – संजय बजाज

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एक वर्ष होऊन गेले चिंतामण नगरच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे.काम अजून प्रगतीपथावर किंवा पूर्णत्वावर नाही.चिंतामणनगरच्या पुलाचे काम अजून देखील संथ गतीने सुरु आहे.

दरम्यान माधवनगर ते कॉलेज कॉर्नर दरम्यान उद्योग धंदे व्यवसाय बंद पडले आहेत ,माधवनगर बाजारपेठ ही ठप्प आहे, व्यापारी सर्वसामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी पंचशीलनगरचा पुलाचे काम सुरु करणार असा नुकताच आदेश काढला आणि पुन्हा एकदा चुकीची पुनरावृत्ती केली चिंतामणानगरच्या पुलाचे काम सुरु करताना कोणत्याच पर्यायी वाहतुक व्यवस्था केली नाही

त्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी सामान्य नागरिक ते व्यापारी वर्गाचे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कारखाना परिसरात शांतिनिकेतन तसेच माधवनगर परिसरात शाळा असल्यामुळे मुलांना शाळेत वेळेवर जाणे कठीण झाले आहे व रेल्वे गेटवर वाहतुक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुलाचे उदघाटन करण्याचे काम करून आपली जबाबदारी झटकली.
काम वेळेत होईल का ? त्याला फंड व्यवस्थित मिळतो का ? याचा पाठपुरावा करताना कुठेच दिसत नाही आहे

पुलाचे बांधकाम करताना प्रशासन नागरिकांना विश्वासात घेताना दिसत नाही आहे , त्याचबरोबर पुलाचे काम करताना रेल्वे प्रशासन,महापालिका,
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बांधकाम विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यात कुठेच समन्वय असताना दिसत नाही.

संपूर्ण नियोजन शून्य , बेजबाबदार काम तसेच प्रशासन तसेच सत्ताधाऱ्याकडून सामान्य जनतेचा विचार होताना दिसत नाही.

पंचशिलनगर रेल्वे गेट दरम्यान शिंदे मळ्यात 4-5 हजारांच्या आसपास लोकवस्ती त्यांना पर्यायी मार्ग नाही शिवाय त्या परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन पूर्ण क्षमतेने शिफ्ट करण्यात आली नाही.

एकूणच चिंतामणनगरचा पूल पूर्ण क्षमतेने सुरु झाला नसताना प्रशासनाने जुना बुधगाव- पंचशीलनगरचा पूल करण्याचा अट्टाहास करू नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले व तीव्र आंदोलनाचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.