प्रतिष्ठा न्यूज

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका मुलीच्या धर्मांतराचा डाव उधळून लावला; सांगलीतील घटना

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी  : शहरातील विस्तारित भागातील नुकतेच 18 पूर्ण झालेल्या  हिंदू तरुणी शाळेत जात असताना पाठीमागे लागून  प्रेमाच्या जाळ्यात ओढून  लावजिहादी मुस्लिम तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्या बरोबर लग्न करून तिचे *इस्लाम धर्मात शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन नोटरी करून  तिचे धर्मांतरण केले* . अशी तक्रार  मुलीच्या आई-वडिलांनी  *हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे* यांच्याकडे केली. तातडीने पाऊल उचलून  हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना  मुलीच्या मिसिंगची केस दाखल करण्यास सांगितले. पोलिसांनी  तातडीने  शोधपथक रवाना केली असता मोबाईलच्या टॉवर  लोकेशन वरून त्याचा ठाव ठिकाण सापडला व मुलीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये हजर राहण्यासाठी येत असताना वाटेतच  बुरखा घातलेल्या त्या हिंदू मुलीला नातेवाईकांनी व हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन तिच्या हातात बांधलेले ताबीज, दोरे, बुरखा काढून टाकला व तिचा ब्रेन वॉश करून पुन्हा नोटरी करून इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतरण करून परत आणले व मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला कि, *“मला फसवून  भावनिक व मानसिक  दबाव निर्माण करून  माझे धर्मांतरण करण्यात आले होते.”*
तरी सदर मुलीने इथून पुढे तिच्या वडिलांजवळ व हिंदू धर्मातच पुढील आयुष्य जगायचे आहे असा जबाब ही दिला व सदर मुलीला आई वडील आपल्या घरी घेऊन गेले.

      यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले कि, *सांगली जिल्ह्यातील स्टॅम्प व्हेंडर आणि  व नोटरी वकिलांनी  शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर  हिंदू तरुणींना हिंदू धर्मातून इस्लाम धर्मामध्ये  धर्मांतर करायची नोटरी करू नये सदरची नोटरी बेकायदेशीर आहे. शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर  जर धर्मांतरण झालं तर भारताला इस्लामी राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही म्हणून शंभर रुपये स्टॅम्पवर  हिंदूचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा स्टॅम्प व्हेंडर व नोटरीचे लायसन्स रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.*

      *हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदर धर्मांतराचा डाव उधळून लावला. यासाठी हिंदू एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांनी पुढाकार घेतला.*

यावेळी आशिष साळुंखे, अंकुश जाधव, अनिरुद्ध कुंभार, आकाश जाधव, प्रदीप निकम, विनायक खेत्रे, राहुल बोळाज, आकाश जाधव, श्रीनिवाज नाझरे, संजय जाधव, राजू जाधव, अनुज निकम, मयूर निकम, श्रीधर मिस्त्री आदींसह हिंदू एकता आंदोलन, रा. स्व. संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.