प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्याच्या आरोग्यसेवेत लाईफकेअर हॉस्पिटलचे काम गौरवास्पद – रामहरी राऊत

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्याच्या आरोग्य सेवेत लाइफ केअर हॉस्पिटल चे काम गौरवास्पद असल्याचे मत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख राम हरी राऊत यांनी लाईफकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तासगावच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.या शिबिराचे उदघाट्न राऊत यांच्या हस्ते झाले.यावेळी ते म्हणाले की,मुख्यमंत्री सहायता निधीतून हॉस्पिटलने गेल्या महिन्याभरात बऱ्याच रुग्णांवर यशस्वी उपचार केले त्याबद्दल हॉस्पिटलचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.हॉस्पिटलने अशाच आणखी योजना गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी लागेल ती मदत,मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांचा दूत म्हणून, आम्ही करू असे आश्वासनही दिले.राज्यातील कोणताही रुग्ण पैशाविना उपचार न घेता परत जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेऊया असे ते म्हणाले.यावेळी राज्य विस्तारक गौरव गुळवणी,संपर्कप्रमुख अमोल पाटील,तालुकाप्रमुख संजय दाजी चव्हाण,तासगाव-कवठेमंकाळ वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख सचिन शेटे,विद्याताई गायकवाड महिला आघाडी प्रमुख,दशरथ निकम तालुका संघटक,अधिकराव लोखंडे इ.पदाधिकारी उपस्थित होते.
तज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक सोयी – सुविधानि युक्त,२४ तास रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असणारे लाईफकेअर हॉस्पिटल व सर्व स्टाफ टीम यांनी,या मोफत महाआरोग्य शिबीर मध्ये जवळ – जवळ 200 रुग्ण तपासले.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून ऑपरेशन्स साठी आतापर्यंत 10 ते 12 रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत झाली आहे.यावेळी डॉ.सुधाकर अलमद,डॉ.अनिकेत हजारे,डॉ. किरण गायकवाड,डॉ.संदेश,श्री प्रथमेश यादव,संजय तुपे,प्रसाद नलावडे,व सर्व स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका सौ.श्रद्धा खराडे यांनी केले,तसेच कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले,तसेच आभार प्रदर्शन डॉ.विजय मानेपाटील यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.