प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या मिलींद सुतार यांची अभिनंदनीय निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : येथील मिलींद सुतार हे ग्राहक संरक्षण क्षेत्रात गेली १४ वर्षे कामं करत असून,ते करत असलेल्या कामाची आणि विशेषतः त्यांच्या प्रबोधन विषयक कामगिरीची दखल घेत जागृत ग्राहकराजा सामाजिक संघटनेने त्यांची राज्य कार्यकरिणीत राज्य सह संघटक म्हणून निवड केली आहे.संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या जागृत ग्राहकराजा सामाजिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे संपन्न झाली.या सभेत आगामी ३ वर्षासाठी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती खालीलप्रमाणे.
अध्यक्ष:दिलीप फडके रा.विंझर पुणे
उपाध्यक्ष- ऍड अनिल गोडबोले रा.पुणे
उपाध्यक्ष- श्रीमती वसुधा सावरकर रा. शेवगांव जि.नगर
सचिव – प्रा.नागनाथ स्वामी रा.वडूज जि.सातारा
सह सचिव-अविनाश चोरघे रा.पुणे
संघटक- दिलीप पाटील रा.मसूर जि. सातारा
सह संघटक-मिलिंद सुतार रा. तासगांव जि.सांगली
महिलाध्यक्ष- सौ.प्राजक्ता पाध्ये रा. नसरापूर जि.पुणे
महिला संघटक – सौ शैला शिळीमकर रा.पुणे
महिला सह संघटक – सौ.सारिका पाटील रा.मांगले जि.सांगली
कोषाध्यक्ष-अनंत खोचरे रा.टाकवे जि. सांगली
प्रसिद्धी प्रमुख-प्रा.रामानंद पुजारी रा. कराड जि.सातारा
याचसोबत सांगली,सातारा,पुणे,नगर, रायगड आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि संघटक सुध्दा घोषित करण्यात आले.आभार प्राजक्ता पाध्ये यांनी मानले.मिलींद सुतार हे गेली १४ वर्षे ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये तसेच सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत मा.शेखर गायकवाड यांच्या कार्यकाळात सदस्य म्हणून काम केले होते.सध्या ते सांगली येथील ग्राहक न्यायालयात शासन नियुक्त मध्यस्थ (मेडिएटर) म्हणून काम पाहतात.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.