प्रतिष्ठा न्यूज

राज्यस्तरीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात सह्याद्री कदमची निवड..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राज्यस्तरीय 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात सह्याद्री कदमची निवड झाली आहे.१ऑक्टोबर पासून नागपूर येथे होणाऱ्या डोमेस्टिक T-२० साठी लवकरच ती रवाना होणार आहे.तीने सांगली येथे झालेल्या एक दिवसीय आंतरजिल्हा इन्व्हिटेशन सामन्यांमध्ये मध्ये लातूर विरुद्ध 220 रन्स,धुळ्याविरुद्ध नॉट आउट 115 तसेच नाशिक बरोबर खेळत असताना 61 धावा केल्या आहेत.इनविटेशन मॅचेसमध्ये महाराष्ट्रात हायेस्ट रन्स बनवून सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष तिने वेधून घेतले होते.यानंतर केरळ येथे इंटर स्टेट मॅचेस झाल्या त्यामध्ये देखील तिने केरळ,बंगाल आणि छत्तीसगड संघांविरोधात उत्तम कामगिरी केली आणि याच कामगिरीची दखल घेत तिची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली आहे.सह्याद्री कदम ही वयाच्या ७ व्या वर्षापासून तासगाव -सांगली असा रोजचा प्रवास करून प्रॅक्टिस करत होती.आज तिच्या व तिच्या आईवडिलांच्या कष्टांना यश येताना दिसत आहे.तिचे वडील अभिजित कदम हे बांबवडे गावचे माजी उपसरपंच असून सध्या ते तासगाव येथे शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत,तर आई माया कदम ह्याचं तासगाव येथे कपड्यचे दुकान आहे. तासगावचें माजी नगराध्यक्ष दिनकर दादा धाबूगडे यांची ती नात आहे. याआधी १५ वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात देखील ती सलग दोन वर्ष खेळली आहे.सांगली येथे भारतीय संघातील खेळाडू स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मानधना सर यांनी सुरू केलेल्या एस एम १८ या अकॅडमित तिला प्रशिक्षणाचे धडे मिळाले.यासाठी तीला मार्गदर्शक म्हणून स्मृती मानधना,श्रीनिवास मानधना तर प्रशिक्षक म्हणून अक्षय पाटील,अनंत तांबवेकर यांचं मार्गदर्शन लाभले,त्याचबरोबर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज,सांगली क्रिकेट असोसिएशनचे राहुल आरवाडे यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.