प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई; दोन लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना यश आले आहे. आरोपीचे नाव विनायक बजरंग खुटाळे, वय ३० वर्षे, रा शिंदे मळा, बिरनाळे हायस्कूल जवळ, संजयनगर असे असून त्याच्याकडून दोन लाख पंचावन्न हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने दि. ०५/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोना/सोमनाथ गुंडे व पोशि/अभिजित ठाणेकर यांना त्यांचे बातमीदाराकडून एक इसम चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करणेकरीता सांगली गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्डाकडे जाणारे रोडवर येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, सांगली गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्डाकडे जाणारे रोडवर कॅच करीत असताना एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संथी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विनायक बजरंग खुटाळे, वय ३० वर्षे, रा शिंदे मळा, बिरनाळे हायस्कूल जवळ, अभिनंदन कॉलनी, संजयनगर असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पचार यांनी त्यास अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पॅटचे खिशात पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्यास त्याचे कब्जातील सोन्याचे दागिनेबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने नागज फाटा येथे दिवसा घराचे लॉक तोडून घरफोडी केली होती सदरचे सोन्याचे दागिने हे त्यावेळी मिळालेले असल्याची कबुली दिली.

सदर सोन्याचे दागिनेबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरील प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री इाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपासकामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील पोना / सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, पोशि / सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, सुरज थोरात, रोहन घस्ते, अभिजित माळकर, विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, प्रमोद साखरपे, सायबर पोलीस ठाणे कडील पोना / अजित पाटील

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.