प्रतिष्ठा न्यूज

मानवी जीवन समृद्धीसाठी संशोधकांनी समन्वयाची भूमिका घ्यावी- डॉ. सुबोध शर्मा; गगनबावडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. “विज्ञान, व्यवसाय आणि मानव्यशास्त्र या विद्याशाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहयोगी नवकल्पना” या मुख्य विषयावर शोधनिबंध सादरीकरण व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन डॉ. दिलिप जवळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी विभाग, काठमांडू विद्यापीठ, नेपाळ येथील शास्त्रज्ञ डॉ. सुबोध शर्मा यांचे बीजभाषण झाले. “जागतिक हवामान बदल वेगाने होत असून, भविष्यात मानवी जीवन धोक्यात येईल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे, या परिस्थितीत संशोधकांनी समन्वयाची भूमिका घ्यावी” असे प्रतिपादन डॉ. शर्मा यांनी केले. उद्घाटनपर मनोगतात डॉ. जवळकर यांनी नव्या संशोधकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शनात डॉ. सागर डेळेकर यांनी “तरुण संशोधकांनी पुनर्प्रक्रियेतून उद्योगनिर्मितीला बळ द्यावे” असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी आपल्या मनोगतात “दुर्गम भागात उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी सातत्याने एकत्र येणे गरजेचे आहे” असे मत मांडले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई हे होते. अध्यक्षीय समारोपात बोलताना “गगनबावड्याच्या इतिहासात प्रथमच अशा परिषदेचे आयोजन करण्यात आले, दुर्गम भागात उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी समन्वयाने पूढे जाऊया” असे प्रतिपादन प्रा. देसाई यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते संशोधन गोषवारा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्था सचिव डॉ. विद्या देसाई, तहसिलदार श्री. बी. जी. गोरे, डॉ. एन. आर. पाटील, डॉ. के. व्ही. मारुलकर, डॉ. एल. पी. लंका, प्राचार्य डॉ. रायदुर्गम नारायण, डॉ. एम. ए. कोळी, डॉ. एस. ए. व्हनाळकर, ए. डी. पाटील, सौ. मानसी कांबळे, डॉ. आर. एस. अडनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, निमंत्रक डॉ. एस. एस. भोसले, प्रा. राहूल कांबळे, समन्वयक प्रा. ए. एस. कांबळे, प्रा. ए. आर. गावकर, खजिनदार प्रा. एस. एस. घाटगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. परिषदेस प्राध्यापक, उद्योजक, संशोधक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.