प्रतिष्ठा न्यूज

उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुंडांवर कारवाई करणार : पोलीस अधीक्षक संदीप घुगे; सांगली जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
आज दि.०७.१०.२०२४ रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. सदर बैठकीत उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. उद्योजकांनी आम्ही यापुर्वी झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांप्रमाणे आपण कुपवाड एमआयडीसी येथे चौकीची स्थापना केल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू काही गुंड प्रवृत्तीचे लोक उपद्रव करून एमआयडीसीतील विविध कारणांसाठी पैशांची मागणी करतात. कुपवाड येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैद्य खोकीधारक आहेत, देशी दारू दुकांनाच्या आस्थपना उशिरापर्यंत चालू असतात. सद्या कुपवाड येथे रस्त्यांची कामे सुरू असून त्यामुळे वाहतूकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होतो असे आपले मुद्दे मांडले.

सदर मुद्यांच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक उपद्रव करून एमआयडीसीतील विविध कारणांसाठी पैशांची मागणी करतात. आपण तशा तक्रारी दिल्यास त्यांच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल करून कठोरपणे कायदेशीर कारवाई करू असे सांगितले. तसेच अवैध खोक्यांच्या बाबतीत त्यांचे मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण काढून घेण्यात येण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल. कुपवाड भागात रस्त्याची कामे सुरू असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होवून वाहतूक धिम्या गतीने सुरू असतो त्याकरीता ट्राफिक कडील ०२ अंमलदार नेमण्यात येणार आहेत. एमआयडीसीमधील सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत अशा सुचना केल्या.

सदर बैठकीकरीता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे रमेश आरवाडे, श्रीमती वसुंधरा बिरजे, एमआयडीसी प्रादेशिक अध्यक्ष, कामगार आयुक्त कार्यालय येथील श्री. सी.टी.गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर, उपविभागीय अधिकारी शहर विभाग, श्रीमती विमला एम, उपविभागीय अधिकारी, श्री. प्रणिल गिल्डा, मिरज विभाग, मिरज, पोलीस निरीक्षक श्री. सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस निरीक्षक श्री. बयाजीराव कुरळे, संजयनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री. प्रविण कांबळे, विश्रामबाग पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक भांडवलकर, कुपवाड पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अकीब काझी, जिल्हा विशेष शाखा, उद्योजक श्री. रमाकांत मालू, श्री. अनंत चिमण, श्री. सचिन घेवारे, श्री. हर्षल खरे, श्री. भावेश शहा, श्री. राहुल पाटील यांचेसह १८ ते २० उद्योजक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.