प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहराचा येणाऱ्या ५० वर्षांचा विचार करुन तासगाव पालिकेने नूतन इमारतीचे बांधकाम केले असून,पालिकेची नूतन इमारत सध्या तासगावकर नागरिक व येणाऱ्या नूतन कारभारी यांच्या स्वागताला सज्ज आहे.
तब्बल १३ कोटी रुपये खर्च करुन बांधलेली ही इमारत ५० हजार स्क्वेअर फूट मधे चार मजली आहे. वि. स. पागे प्रशासकीय भवन असे या इमारतीचे नामकरण केले आहे.
पार्किंग,सुरक्षा,व्यापारी गाळे,व मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्वच विभागांचे सभापती यांची सुसज्ज व चकाचक केबिन असून बाहेर आरामदायी प्रतीक्षा कक्ष,प्रतीक्षा कक्षाच्या समोर तासगाव तालुक्याचं ऐतिहासिक वैभव दाखवणारी, तासगाव कचेरीवरील उतरलेला युनियन जॅक,सर्कससिंह परशुराम माळी यांची सर्कस,तासगावचा रथोत्सव,गणपती मंदीर व तासगावची द्राक्ष अशी शिल्प आहेत.इमारतीत अग्निरोधक यंत्रणा व प्रत्येक खोलीत हिरवळ करण्यात आली आहे.शासनाच्या ‘माझ झाडं’ या उपक्रमा अंतर्गत प्रत्येकाच्या केबिनला झाडे ठेवण्यात आली आहेत. ही झाडे प्रत्येकाने पाणी घालून जगवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.पालिकेची इमारत सुसज्ज असावी अशी मागणी नागरिकांची होती.तासगाव नगरपालिकेची स्थापना १८६५ ची परंतु १५९ वर्षांनी पालिकेला प्रशस्त इमारत मिळाली असून याचे लोकार्पण उद्या सकाळी 10 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होत आहे.तरी या नूतन वास्तुच्या लोकार्पण सोहळ्यास तासगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.