प्रतिष्ठा न्यूज

देशी बनावटीचे अवैध पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक; पिस्तुल व २ जिवंत काडतुस हस्तगत ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : देशी बनावटीचे अवैध पिस्तुल बाळगणाऱ्यास नयन लक्ष्मण पाटील, वय २१ वर्षे, रा नारायणटेक टोप, ता हातकणंगले, जि कोल्हापूर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन पिस्तुल व २ जिवंत काडतुस असा पन्नास हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कामगिरी केली.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील पोहेकों कुबेर खोत व पोशि अभिजित ठाणेकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम इटकरे फाटा येथे येणार असून त्याचे कब्जात पिस्टल आहे. नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे इटकरे फाटा येथे वॉच केला असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने
सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) नयन लक्ष्मण पाटील, वय २१ वर्षे, रा नारायणटेक टोप, ता हातकणंगले, जि कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष अंगड़ाडती घेतली असता, त्याचे पैंटचे खिशात देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणे बाबत त्याचेकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्या बाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोशि/अभिजीत ठाणेकर यांनी कुरळप पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कुरळप पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कुरळप पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों/ सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील, अभिजीत ठाणेकर, दिपक गट्टे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, प्रमोद साखरपे पोशि / सायबर पोलीस ठाणेकडील पोशि / अजय पाटील, करण परदेशी, विवेक साळुंखे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.