प्रतिष्ठा न्यूज

नांद्रे गावात एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही, आमदार सुधीरदादा गाडगीळ ; नांद्रे बनकर रस्ता, माजी सैनिक संरक्षक भिंत व भगवान महावीर मंदिराच्या सभागृहाचे शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १४ : नांद्रे हे गाव सतत प्रगतीपथावर राहिले पाहिजे. गावातील उर्वरित शिल्लक कामांची एक यादीच करून मला द्या. एका फटक्यात सर्व कामे पूर्ण करून टाकू. यापुढे नांद्रे गावामध्ये एकही समस्या शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
नांद्रे येथे भगवान महावीर मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भगवान महावीर मंदिराच्या सभा मंडपासाठी ३५ लाख रुपये आमदार निधीतून मंजूर झाले आहेत. नांद्रे येथील माजी सैनिक कल्याण संस्था येथे वॉल कंपाउंडच्या बांधकामाचा प्रारंभही आमदार गाडगीळ यांच्या हस्ते झाला. यासाठी 5 लाख 67 हजार रुपये मंजूर झाले आहेत. जिल्हा नियोजन समिती योजने अंतर्गत नांद्रे येथील बनकर रस्ता सुधारणा करणे यासाठी 54 लाख 99 हजार रुपये कामाचा प्रारंभही आमदार गाडगीळ यांच्या हस्ते झाला. गेल्या दहा वर्षात आमदार गाडगीळ यांनी नांद्रे गावामध्ये अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी भाषणात दिली. तसेच आमदार गाडगीळ यांनीच विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणीही सर्वांनी केली. नांद्रे गावातून यावेळी तुम्हाला मोठे मताधिक्य देऊ असेही समस्त ग्रामस्थांनी सांगितले. भगवान महावीर मंदिराच्या सभागृहाचे काम आमदार गाडगीळ यांच्या विकास निधीतून होणार आहे. त्यामुळे गावातील समस्त जैन बांधवांसाठी चांगली सुविधा झाल्याची मनोगतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी जैन समाज पदाधिकाऱ्यांनी आमदार गाडगीळ यांचा सत्कार केला. माजी सैनिक कल्याण संस्था येथे वॉल कंपाऊंडचे बांधकाम झाल्यामुळे मोठी सोय झाल्याची झाल्याचे मनोगतही या कामाच्या प्रारंभाच्या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच जिल्हा नियोजन समिती योजने अंतर्गत नांद्रे येथील बनकर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे या रस्त्यावरून शेतीची वाहतूक सुलभ होणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी पंचायत समिति माजी उपसभापती राहुल सकळे, सरपंच महावीर भोरे, सतीश हेरले, कलगोंडा पाटील, गुंडू पाटील, डॉ अशोक सकळे, डॉ पंकज कुपवाडे, रमेश भोरे, सावकार पाटील, प्रकाश चौधरी, सुधीर चौधरी, दादा इंगळे, महावीर भिलवडे, सुभाष वनकुंद्रे, सुभाष पाचोरे, घुमट खोत, कुंतीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत सकळे, भीमराव बाबुराव माने गंगाराम एडके तानाजी बाळकु माने, संजय भोरे, सुधीर भोरे, घुमट खोत, रावसाहेब एतवडे सागर माने, पांडुरंग बंडगर, माजी सैनिक अनिल माने, माजी सैनिक शामराव कमलाकर, माजी सैनिक नदाफ साहेब, माजी सैनिक भिमराव सोहासे, माजी सैनिक विठोबा माने आदि मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आदि नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.