प्रतिष्ठा न्यूज

आर्डे सरांनी चळवळीस वैचारिक नेतृत्व दिले – साहित्यिका नीलम माणगावे ; आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार डॉ. सविता अक्कोळे यांना प्रदान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रा. प.रा.आर्डे हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांनी चळवळीचे वैचारिक नेतृत्व केले असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांनी केले.

त्या काल प्रा. आर्डे सरांच्या व्दितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. यावर्षी चा ‘प्रा.प.रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ डॉ. सविता अक्कोळे (बुधगाव) यांना नीलम माणगावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रु.पाच हजार आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

नीलम माणगावे पुढे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर, आर्डे सरांच्या जाण्याने चळवळीत जी पोकळी निर्माण झाली आहे ती आपण सर्वजण मोठ्या जिद्दीने, जोमाने अधिक काम करुन भरुन काढत आहोत. हे अधिकचे काम करण्याची कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आर्डे सरांच्या नावाने हा स्मृति प्रेरणा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी डॉ. सविता अक्कोळे यांची योग्य निवड केली आहे.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सर्जेराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे नेते डॉ. महावीर अक्कोळे, विज्ञान लेखक जगदीश काबरे, सत्कारमूर्ती डॉ. सविता अक्कोळे, हर्षवर्धन सावंत यांची समोयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली आर्डे कौरवार, स्वागत डॉ. संजय निटवे, सुत्रसंचलन राहुल थोरात तर मानपत्राचे वाचन विनय आर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन गीता ठाकर, त्रिशला शहा, आशा धनाले, सुहास येरोडकर, मालोजीराजे माने, स्वाती वंजाळे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.