प्रतिष्ठा न्यूज

सिपीआर उपचाराने शिरोळच्या व्यक्तीचें वाचले प्राण.. तासगावच्या मंगलमूर्ती संस्थेचें सदस्य बनले देवदूत

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दरवर्षी प्रमाणे कवठेएकंद येथे दसऱ्या दिवशी होत असलेल्या पालखी सोहळ्यास होणारी आतिष बाजी पाहण्यास यावर्षी देखील तालुक्यासह संपूर्ण राज्यातील लोकांची मोठी गर्दी झाली होती.नेत्र दीपक व नयनरम्य आतिष बाजीचा आनंद उपस्थित लोक घेत होते.शिरोळ येथील एक व्यक्ती व त्यांचा मुलगा सुद्धा ही आतिषबाजी बघण्यासाठी कवठेएकंद येथे आले होते.आतषबाजी पाहत असतानाच अचानक त्या व्यक्तीला चक्कर आली, आणि पुढच्या काही मिनिटात त्या व्यक्तीची हालचाल पूर्ण बंद झाली. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यांच्या भोवती मोठी गर्दी झाली. अनेक जण काय झाले काय झाले यासाठी पुढाकार करून पुढे येत होते. व पहात होते.त्याचवेळी आतषबाजी पाहण्यासाठी गेलेले तासगावातील मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचे सदस्य निकम व लिमकर हे तेथून जात होते. गर्दी पाहून ते त्या ठिकाणी थांबले. पुढे जाऊन पाहिले असता एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत व त्यांचा मुलगा बाबा उठा बाबा उठा करून रडत आहे.हे चित्र त्यांना पाहवयास मिळाले.घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विचार न करता निकम व लिमकर यांनी गर्दी बाजूला करून त्या व्यक्ती जवळ गेले.ग्रामीण रुग्णालयात लॅबमध्ये कामाचा अनुभव असल्याने निकम यांनी त्यांची नाडी चेक केली,तर हृदयाचे काम बंद झालेचे त्यांच्या लक्षात आले.त्या व्यक्तीचें पूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते.त्वरित निकम व लिमकर यांनी त्या व्यक्तीच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली सलग २ मिनिटे दाब दिल्यानंतर थोडी हालचाल झाली हे लक्षात येताच गर्दी बाजूला करण्याचा प्रयत्न निकम व लिमकर यांनी केला.उपस्थित लोकांनी ही साथ दिली.एका आवाहनावर लगेच बाजूला होत हवा येण्यास जागा दिली.मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेच्या सदस्यांच्या वतीने वेळीच छातीवर झालेला दाब आणि वेळीच मिळालेली मोकळी हवा यामुळे ती व्यक्ती थोड्या वेळाने उठून बसली.त्यांच्या मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले,बाबा म्हणून त्याने त्यांना मिठी मारली तिथे असणाऱ्या मंदिरात एक ताई होत्या त्यांनी लगेच साखर व पाणी आणून दिले.तासगावची मंगलमूर्ती सेवाभावी संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून अनेकांच्या मदतीला धावून जाते.संस्थेच्या  सदस्यांनी देवदूत बनून त्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.