प्रतिष्ठा न्यूज

माजी आमदार स्व. विनायक मेटे यांना नांदेड येथे वाहिली सर्व राजकीय पक्षाच्या वतीने श्रद्धांजली

प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.22 : मराठा आरक्षणासाठी झटणारे, बहुजांचे लढवय्या नेतृत्व, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्व. श्री विनायकराव मेटे साहेब पुणे- मुंबई महामार्ग रस्ता अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले.
ते रविवारी दि. 14 ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे मराठा आरक्षण बैठकीस उपस्थित राहण्यासाठी जात असतांना पहाटे च्या सुमारास दुर्दैवाने निधन झाले.
त्यांनी विधानपरिषदेत आणि बाहेर शेतकरी, कामगार, आदिवासी बांधव, गोर गरीब समाजासाठी सातत्याने प्रश्न, उपस्थित केले. मराठा समाजांचा आरक्षणाचा लढा सातत्याने चालू ठेवला. त्यांच्या आकस्मिक निधनाने समाज एका धाडसी, लढवय्या नेत्यांस पोरका झाला आहे.
अधिवेशनात त्यांचा प्रश्न विशेष औचित्य, तारांकित प्रश्न असायचे. एवढेच नव्हे तर अनेकवेळा मंत्र्यांना सुद्धा यांच्या प्रश्नांनांची दखल घेतली होती.
स्व. विनायकरावजी मेटे यांना सर्व सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने,सर्व पक्षीय सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी हनुमान मंदिर, विजयनगर, नांदेड येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले. सर्व पक्ष,सामाजिक संघटना,राजकीय संघटना,सर्व पत्रकार संघटना यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री ना. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा नेत्यां माजी मंत्री सुर्यकांता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख कोकाटे पाटील, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष कामाजी पवार यांच्या सह अनेक नेते, शेकडो कार्यकर्ते, पत्रकार मंडळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.