प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड ५० विद्यार्थांना टीसीएस कंपनीत नोकरी : कंपनीकडून वार्षिक ३.३७ लाख रुपये मिळणार पगार

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : देशातील विविध नामांकित कंपनीत सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून टीसीएस कंपनीत महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधुन नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” चा उल्लेख केला जातो.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये अंतीम वर्षात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “टीसीएस” कंपनीकडून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड काॅलेज मधील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील धीरज तपकिरे, अनिकेत पाठक, ओंकार परदेशी, साहिल नदाफ, अविनाश बनसोडे, सुर्यकांत सोनटक्के, अभिषेक घोटगे, प्रदीप दंगापुरे, सतिश कचरे, श्रीराम मुळे, जयदत्त आराध्ये, प्रितम आवताडे, मंथन नाझरकर, विक्रम शिंदे, स्वप्नील जरे, विनय गोडाळे, अनिकेत कुलकर्णी, रूपम परदेशी, प्रज्योत म्हमाणे-पाटील, प्रतिक खामकर, सुरज मेलगे, अजित गरूड, कापिनाथ चोपडे, ऋषिकेश भोसले, प्रसन्ना लांडगे, विश्वजीत पाटील, आदर्श वसेकर, अक्षय गोरे, गणेश जोशी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील अतिक पठाण, मधुकर बिडवे, ज्ञानेश्वरी शिंदे, प्रणिती सुतार, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सलमान बेदरेकर, उमा गायकवाड, संध्याराणी तवटे, अभिजित चांदणकर, सुमित आसबे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील जोत्सना राऊत, शिवानी गाडेकर, महेश पिसे, लखन डुचाळ, प्रद्युम्न शिंदे, योगेश डुचाळ, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रियंका माने, शुभम लहांडे, विद्याराणी क्षीरसागर, अक्षय वेळापूरकर, राजेश शिंदे, शितल बागल आदी ५० विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून टीसीएस कंपनीत निवड करण्यात आली आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय विद्यार्थी व पालकांच्या विश्वास पाञ ठरले आहे. महाविद्यालयाचे प्लेसमेंट व निकाल हे प्रत्येक वर्षे उत्कृष्ट लागत आहे. याचअनुशंगाने नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय” पुरस्कार मिळाला असुन प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या निकालात पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील कुमारी संध्या पाटील हिने ९५.६४ टक्के गुण मिळवून सर्व शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महाविद्यालयाचा प्लेसमेंट व शैक्षणिक आलेख उंचावत असल्याने विद्यार्थी व पालकांमधुन पंढरपूर सिंहगडला
सर्वाधिक पसंतीचे महाविद्यालय म्हणुन ओळखले जात आहेत.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.