प्रतिष्ठा न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा जाकापूर गावकऱ्यांच्या वतीने सत्कार: दत्त मंदिर बांधकामासाठी 10 लाख रु. निधी देण्याची घोषणा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि 7 : आज जाकापुर ता.कंधार येथे दत्त मंदीर येथे दत्तजन्म निमीत्त शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी नवीन होणाऱ्या दत्त मंदिर बांधकामासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले.
यावेळी गोणार सरपंच हरी पाटील पवळे,चेअरमन प्रदीप पाटील नंदनवणकर,गिरीश डीगोळे,सरपंच नीळकंठ कौसल्ये,जाकापुर सरपंच प्रतिनिधी गोपाळ पाटील,शिर्शी सरपंच मनोहर पाटील,मंगनाळी सरपंच अभंगे सह कार्यकर्ते व महिला, गावकरी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी पेठवडज येथे दत्त मंदिर येथे भगवान दत्तात्रेयाचे दर्शन घेतले. त्यांचा संत नामदेव महाराज ज्युनियर काॅलेज येथे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी शिरसी ( बु) गावास धावती भेट दिली. तेथे सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.