प्रतिष्ठा न्यूज

विसापूरची यल्लमा यात्रा उद्यापासुन.. गुरुवारी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :  विसापूर येथील यल्लमा देवीच्या यात्रेस बुधवार पासुन सुरुवात होणार आहे.गुरुवार दि.18 जानेवारी रोजी देवीचा नैवेद्य होणार आहे.याच रात्री *बारा गावच्या बारा अप्सरा * यांचा लावण्यांचा कार्यक्रम रात्री 9 वाजता आयोजित केला आहे.याचबरोबर जोगत्याचा कार्यक्रमहि होणार आहे.त्यानंतर शुक्रवारी 19 तारखेला सकाळी 7 वाजले पासुन देवींची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे.याच दिवशी सकाळी 10 वाजता आणि रात्री 9 वाजता रेखा पाटील सह मेघा कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशाचें आयोजन करण्यात आले आहे.याच दिवशी सायंकाळी 4 वाजले पासुन जंगी कुस्त्यांचे मैदान होणार असून यात अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.यात प्रेक्षनीय आणि चटकदार कुस्त्या होणार आहेत.मैदानात पहिली कुस्ती पाच लाख रुपयांची महान भारत केसरी पै.सिकंदर शेख वी पंजाब केसरी पै. नवजीत सिंग यांच्यात होणार असून,दोन नंबरची चार लाख रुपयांची कुस्ती महान भारत केसरी पै मारुती जमदाडे वी हरियाणा केसरी पै.मोनू सहारा तसेच तीन नंबरची तीन  लाखची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै प्रकाश बनकर विरुद्ध अशोक कुमार हरियाणा, चार नंबरची दोन लाख ची कुस्ती पै महारुद्र काळे वि संग्राम पाटील,आणि पाच नंबरची १ लाखाची कुस्ती पै सुदेश ठाकूर वि पै अभिजीत मोरे यांच्यात होणार आहेत अशी माहिती कुस्ती कमिटीचे अध्यक्ष सुभेदार मुरलीधर माने पाटील यांनी दिली आहे.कुस्त्यांचे आयोजन अध्यक्ष,उपाध्यक्ष प्रकाश (नाना) माने पाटील,प्रवक्ते विजय चव्हाण,प्रल्हाद (बापू )माने,दिलीप (नाना) माने,पांडुरंग शिवणकर,रावसाहेब माने मेजर,बाजीराव (काका) माने,भीमराव मंडले, संपत ज्ञानू माने,जयसिंग (बापू) माने,संपतराव सुतार सर,गणपती (दादा)माने,गायकवाड सर,सर्जेराव (नाना)माने,कुस्ती कमिटी सदस्य तसेच सरपंच अशोक मोहिते,उपसरपंच अशोक अमृतसागर,सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी यांनी केले आहे.तरी याचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घेऊन यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीने  केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.