प्रतिष्ठा न्यूज

रामनवमी निमित्ताने 52 नागरिकांनी केले रक्तदान: मातोश्री प्रतिष्ठान चा उपक्रम : हभप शिवलिलाताई पाटील यांचे 3 एप्रिल रोजी किर्तनाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड प्रतिनिधी : शहरातील आनंद नगर येथे दि.29 मार्च रोजी मातोश्री प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलेले होते. या रक्तदान शिबिरामध्ये सायंकाळपर्यंत 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी हुजूर साहेब रक्तपेढी चे सहकार्य लाभले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी( तंत्रज्ञ) संध्या कांबळे,श्री सचिन थोरात,महेश सोनटक्के,श्री विशाल सर यांनी परिश्रम घेतले.
रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने शहरांमध्ये सुरू असून अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे, मोफत अन्नदान,भंडारा, नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी शहरातील कुसुम सभागृह येथे प्रसिद्ध किर्तनकार हभप शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन सकाळी दहा ते 1 वाजेपर्यंत आहे. या कीर्तनाचा भावीक भक्तांनी आवश्य लाभ घ्यावा असे आव्हान शेकाप महिला प्रदेश अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर पाटील शिंदे तसेच नगरसेवक प्रशांत अण्णा तिडके, सोपान पाटील नेव्हल यांनी आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.