प्रतिष्ठा न्यूज

द्राक्ष व बेदाणा प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तळपत्या उन्हात चड्डी मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : संचार बंदी आदेश व पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या घरावरील मोर्चाला परवानगी नाकारल्याने द्राक्ष व बेदाणा प्रश्नावर गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तळपत्या उन्हात मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले दरम्यान द्राक्ष बेदाणा प्रशनी स्वाभिमानीच्या शिष्ट मंडलबरोबर 20 जून पर्यंत मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याच्या बरोबर मुंबईत बैठक घेवू हे प्रश्न मार्गी लावू असे लेखी पत्र पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वतीने त्याचे प्रतिनिधी प्रा मोहन व्हणखडे यांनी दिले दरम्यान प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला.
द्राक्ष बेदान्याला दर मिळालाच पाहिजे,कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय देत नाही अशी घोषणा देत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे संजय खोलखुंबे भरत चौगुले उमेश मुळे संजय बेले राजेंद्र माने रावसाहेब पाटील दामाजी दूबल सूरज पाटील सुरेश वासगडे राजेंद्र पाटील निशिकान पोतदार आदींनी केले प्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले
आंदोलकासमोर बोलताना महेश खराडे म्हणाले पोलिसी बळाचा वापर सुरू आहे पोलिसांनी पालक मंत्र्याच्या घरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारली त्यातच संचार बंदीचा आदेश लागू करण्यात आला कितीही दहशतीचा वापर केला तरी द्राक्ष बेदाणा उत्पादकांना न्याय दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही द्राक्ष उत्पादकाला अकरी एक लाख रुपये अनुदान दिले पाहिजे बेदा न्याला प्रती टन एक लाख अनुदान द्यावे सद्या द्राक्ष व बेदाणा उत्पादक प्रचंड अडचणीत आहे चिर मुरे महाग आणि द्राक्ष बेदाणा स्वस्त झाला आहे हा शेतकरी जी एस टी क्या रूपाने कोट्यवधी रुपये शासनाला देतोय मग शेतकरी अडचणीत असताना त्यातील थोडा परतावा द्यावा अशी माफक अपेक्षा आमची आहे कांदा उत्पादकाला जशी मदत केली तशीच मदत द्राक्ष उत्पादकाला करावी ग्लोबल वॉर्मिग मुळे हवामान बदलत आहे तापमान प्रचंड वाढले आहे त्यामुळे द्राक्ष शेती पीक विम्याशी जोडावी आताची पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना सुरू करावी तसेच द्राक्ष बेदाणा महामंडळाची स्थापना करावी सध्याचा जमाना जाहिरातीचा आहे द्राक्ष बेदाणा खाणे कसे हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टी व्हीं सुरू करावी बेडान्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा ओशधा वरील जी एस टी कमी करावा तसेच द्राक्ष दलालाची नोंदणी करावी आदी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला स्थानिक प्रश्न आम्ही सोडविले आहे राज्य पातळी वरील प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले 20 जून पर्यंत बैठक घेवून प्रश्न मार्गी न लावल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला
दरम्यान आंदोलनस्थळी पालक मंत्री ना सुरेश भाऊ खाडे यांचे प्रतिनिधी म्हणून मोहन व्हणखंदे आले ते म्हणाले पालक मंत्री हे परदेश दौर्यावर आहेत ते 13 जून ला महाराष्ट्रात येणार आहेत त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावू तसेच या प्रश्ननी मुख्यमंत्री व कृषी मंत्री बरोबर 20 जून च्य आत बैठक घेवू असे सांगितले असून तसे पत्र दिले आहे त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब लिंबेलाई श्रीधर उदगावे सुरेश घागरेअनिल वाघ नागेश पाटील प्रभाकर पाटील प्रकाश माळी सुनील पोतदार निवृत्ती शिंदे सुजित लकडे नागेश खामकर रोहित वारे जगणात भोसले भरत पाटील विनायक पवार अजित हलीगले शांतीनाथ लींबेकाई सुरेश पाचीबरे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.