प्रतिष्ठा न्यूज

विद्यार्थ्यांची वारी पोलीस स्टेशनच्या दारी’ ‘परशुरामच्या’ विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला भेट

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. १० : विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या सर्व कामकाजाची माहिती मिळावी यासाठी परशुराम विद्यालयांच्या   विद्यार्थ्यांनी गगनबावडा पोलिस स्टेशनला भेट दिली व पोलिस स्टेशनचे दैनंदिन कामकाज समजावून घेतले. विद्यार्थ्यांनी प्राचार्य रंगराव गोसावी, प्रा. कुंडलिक जाधव, दीपक पाटील,स्वाती चौगुले  यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती.
गगनबावडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  डॉ. रणजीत पाटील  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खाकी वर्दीची ओळख, पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या, महिला सुरक्षितेसाठी असलेले विशेष ॲप, हेल्पलाइन नंबर इत्यादी सुविधा बाबत जनजागृती व्हावी याची माहिती दिली. रॅगिंग किंवा छेडछाड झाली तर गुन्हा कसा नोंदवावा,तसेच पोलिस स्टेशनचा दैनंदिन कारभार,गुन्हा नोंदविणे याबाबतची माहिती दिली. तसेच अठरा वर्षे पूर्ण होण्याअगोदर व परवाना नसताना वाहन चालवू नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
महिला पोलीस उज्वला माने  यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रे, बंदुक आदींबाबत माहिती दिली.
यावेळी पो हवालदार अनिल पाटील, राजू पाटील  व गगनबावडा येथील पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.