प्रतिष्ठा न्यूज

शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने माँ जिजाऊसाहेब जन्मोत्सवा निमित्ताने महारक्तदान शिबीर व कर्तृत्वान महिला खेळाडूंचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी :  शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता- राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब भोसले यांच्या जन्मोत्सव दिनी 12 जानेवारी 2023 रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन आनंदनगर चौक येथे करण्यात आले आहे.
या जयंती निमित्ताने राजमाता माँ जिजाऊसाहेब कर्तृत्वान महिलांना 2023 चा पुरस्कार देण्यात येणार असुन यात आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.भाग्यश्री माधवराव जाधव  (टोकिओ पराऑलिंपिक), यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
     यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड महानगरपालिकेच्या महापौर- जयश्रीताई पावडे, तर उद्घाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या- आशाताई शिंदे, हे उपस्थित राहणार आहेत, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन- प्रणिताताई देवरे (चिखलीकर), माजी महापौर- शैलेजा स्वामी,  मिनलताई खतगावकर, संध्याताई कल्याणकर, सुशिलाताई बेटमोगरेकर, पुनमताई पवार, पार्वतीताई जाधव, शोभाताई तिडके, सरिताताई बिरकले- नगरसेविका, अपर्णा नेरलकर- नगरसेविका, करूणा कोकाटे- नगरसेविका, प्रियंका ताई कैवारे-नगरसेविका, पूजाताई पवळे- नगरसेविका, सुचिताताई जोगदंड- नगरसेविका, सत्यभामाताई बेजगे, संगिताताई देशमुख, सुशिलाताई मोरे, वच्छलाताई पुयड पुणेगावकर, आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवगर्जना प्रतिष्ठान आनंदनगर नांदेड, यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.