प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात आषाढी एकादीशी निमित्त दिंडी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा गावातून विठ्ठल रखुमाई पायी दिंडी काढण्यात आली. दिंडी रामेश्वर मंदिरातून निघून  उगवाई मंदिरात समाप्त झाली. सर्व ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेतील विद्यार्थी विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताबाई, सोपान देव तसेच वारकरी वेशभूषा विठ्ठलाचे नामस्मरण करत ग्रंथ दिंडीत व रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेत असलेल्या मुलांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले होते. ठिकठिकाणी त्यांची आरती व पूजा केली गेली.

विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे  विठ्ठलाचे भजन व अभंगाचे गायन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडीतील विठ्ठलाचे प्रतिमेचे पूजन करून बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना केली.  सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
सर्वांनी आषाढी एकादशीचे नियोजन प्रगती महिला मंडळ व कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.