प्रतिष्ठा न्यूज

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, खूप शिकून मोठे व्हा : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज

सांगली दि. १८: आयुष्यात मोठी स्वप्ने पहा.. ती साकार करण्यासाठी खूप अभ्यास करून स्पर्धा परीक्षा गाजवून मोठे अधिकारी बना. आई – वडील आपले दैवत आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून खूप शिका.. मोठे बना.. जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांतील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने क्लास वन अधिकारी बनत आहेत. पृथ्वीराज पाटील फौंडेशनने दिलेल्या वहीत सुंदर अक्षर काढा असा आशीर्वाद आज सांगलीवाडी येथील शाळा न. ९ मधील विद्यार्थ्यांना पृथ्वीराज पाटील यांनी दिला. पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे वह्यावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविकात प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी फौंडेशन चे कार्य व वह्यावाटप उपक्रमाची माहिती दिली.

शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मस्के म्हणाले, ‘बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना वह्या देऊन पृथ्वीराजबाबा पाटील व फौंडेशनने चांगले कार्य केले आहे. बाबा कायमच चांगल्या कामासाठी मदत करतात.’

यावेळी दिलीपभाऊ पाटील, महाबळेश्वर चौगुले, आनंदा पाटील, मोहन पाटील, सूरज पाटील, अरुण चौगुले, शिक्षिका लता परीट, अंकुश चौगुले, विशाल पाटील, प्रतिक फडतरे, नितीश पाटील व पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.