प्रतिष्ठा न्यूज

तासगाव सिद्धेश्वर कॉलनीतून जाणारा जुना तासगाव तें सांगली रस्त्याचे डांबरीकरण करा..

स्वराज्य पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव सिद्धेश्वर कॉलनीतून जाणाऱ्या जुन्या सांगली रस्त्याची दुरावस्था झाली असून तो रस्ता तातडीने दुरुस्त करून डांबरीकरण व्हावे यासाठी स्वराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कदम यांनी तासगावचे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
तासगाव काॅलेजच्या पश्चिमेकडील बेंद्री रस्त्याचा फूट रस्ता हा मार्ग इतर जिल्हा मार्ग क्रमांक ९६ तासगाव ते सांगली असून हा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे,
इतर जिल्हा मार्ग क्रमांक ९६ तासगाव ते सांगली,जुना बिसूर रस्ता या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर सगळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्यात खड्डे पडलेले आहेत की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही.रस्त्याने माणसाला धड चालताही येत नाही.दुचाकीही त्या रस्त्याने सध्या जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री सडक मधून रस्ता मंजूर झाला आहे,या रस्त्याचे सर्व्हेक्षण ही झाले आहे असे फक्त सांगितले जाते मात्र कार्यवाही होताना दिसत नाही. तसेच या रस्त्यावरून शाळेला जाणा-या येणाऱ्या विद्यार्थ्यांचीं संख्या मोठी असून त्यांना ये जा करण्यात अडचणी येत आहेत तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कदम यांनी तहसील प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.