प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक सेनेचा स्तुत्य उपक्रम : शिक्षक दिनानिमित्त लोहा तालुक्यातील 45 शिक्षकांचा गौरव

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :  दि.5 सप्टेंबर रोजी डाॅ.सर्वपल्ली राधा कृष्णन यांंच्या जन्म दिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने लोहा तालुक्यातील अनेक गावातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील, गुणवंत, होतकरु, व कलाशिक्षक अशा 45 शिक्षकांचा सत्कार शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा सहसमन्वयक- बालाजी भांगे, तालुकाध्यक्ष- संभाजी पवार यांचे वतीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यात (सुनेगाव)- लहू पंदलवाड, भुजंग वाघमारे, लक्ष्मण अन्नकाडे, घोडके सर, वामन पवार, रवी राठोड, निशा भंडारे मॅडम, (बोरगाव)- मुख्याध्यापक- बळी शेलगावकर, (लोहा)- हेमंत कंवर, संजय कागणे, नंदकिशोर गुंडरे, फारुख शेख, राजु तिडके, भगवान चव्हाण, छाया बैस मॅडम, काशिबाई केंद्रे मॅडम, सागर ताटे मॅडम, (दगडगाव)- भगवान सोनटक्के
(सोनखेड)- सविता फुलारी, मंगला पवार, (शिवनी)- बळीराम जाधव, दिपक भुरे, डी.बी.वडवळकर, लक्ष्मण बिडवई, बालाजी गादगे, सविता जगडवाड, (भाद्रा)- डी.डी.नलबलवार, मारोती बट्टलवाड, (तांडा)- राहूल बनसोडे, (खांबेगाव)- ऊषा मद्रेवार मॅडम, संगिता राठोड मॅडम, (सुभाषनगर)- बी.एच.ठाकूर,  (सोनमांजरी)- संभाजी केंद्रे, (तांडा)- उत्तम डोंपले, मायकोडे मॅडम, (पोलीसवाडी) मुख्याध्यापक- वैजनाथ खेडकर, मारोती केंद्रे, नागेश स्वामी, एस.आर.गायकवाड, वर्षा सरोदे मॅडम, जोती सगर मॅडम, विठ्ठल जालणे, या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचा गौरव करण्यात आला. या अभिनव उपक्रमाबद्दल शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.