प्रतिष्ठा न्यूज

जमिनीच्या वादातून भावकीच भिडली, कलम 307 तर तिघांना ईंटरीम अटकपूर्व जामीन मंजूर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील घटनेत 23 जणांवर कलम 307,326 सह अन्य कलमानुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये  दि.1नोव्हेंबर 2023 रोजी कंधार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. कपिल पाटील गाडेगावकर यांच्या मार्फत दाखल जामीन अर्जावर युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिघांना ईंटरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
किवळा येथील टर्के कुटूंबात अनेक दिवसांपासून जमिनीच्या विषयावरुन धुसफूस सुरु होती. अनेक वेळा त्यावरुन शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. परंतू हा वाद विकोला गेल्याने राडा झाला.
जमिनीच्या वादातून भावकीच एकमेकांना भिडली. यावेळी झालेल्या राड्यात दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारींवरून 23 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत.
प्रभाकर दिगंबर टर्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पूर्वीच्या वादातून चुलत भाऊ व मित्रासह दगड आणि  काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणात विश्वनाथ संजय टर्के, साईनाथ दयानंद टर्के, अश्विन विजय टर्के, विजय शंकर टर्के, शिवाजी शंकर टर्के, साईनाथ सुभाष टर्के, नवनाथ सुरेश टर्के, संजय बालाजी टर्के, सुरेश बालाजी टर्के, विजू शंकर टर्के, दिगंबर शंकर टर्के, आदिनाथ बबन टर्के यांच्या विरोधात गुन्हा क्र. नोंदविण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटाच्या विश्वनाथ संजय टर्के यांच्या तक्रारीनुसार जमिनीच्या वादातून आरोपींनी आई आणि चुलत भावासह मला मारहाण केली, असे नमूद आहे. त्यावरून अच्युत टर्के, प्रभाकर टर्के, दत्तराम टर्के, अखिलेश टर्के, महेश ऊर्फ बंटी टर्के, दिगंबर दादाराव टर्के, ओम गोविंद टर्के, हनुमंत गाडे, कृष्णा शाहूराज ढगे, कृष्णा बारोळे, सचिन गोरखनाथ मोरे यांच्याविरोधात सोनखेड पोलिसांनी गुन्हा क्र.142 नोंद केला आहे.
प्रभाकर दिगंबर टर्के यास अटक करण्यात आली आहे तर, यामध्ये  दि.1नोव्हेंबर 2023 रोजी कंधार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. कपिल पाटील गाडेगावकर यांच्या मार्फत दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होऊन वकीलांच्या युक्तिवादा नंतर दिगंबर टर्के, दत्ता टर्के व महेश टर्के याना कलम 307, 326, 324 अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात तिघांना न्यायालयाने ईंटरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.