प्रतिष्ठा न्यूज

भाजपा, जनसुराज्यच्या वतीने मिरजेत गुरूवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; प्रभू रामचंद्रांच्या १०० फुटी रांगोळी – प्रा. मोहन व्हनखंडे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : भाजपा आणि जनसुराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्रांची रांगोळी, गीतरामायण, रामायणातील विविध आंतरशालेय पात्रांच्या वेशभूषा स्पर्धा, दीपोत्सव, महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्रा. मोहन व्हनखंडे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार यांनी दिली. यावेळी महादेव कुरणे, बाबासाहेब आळतेकर, दिगंबर जाधव, सागर वनखंडे उपस्थित होते.

मिरज शहरात गुरुवारी १८ जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या १०० फुटी रांगोळीचा समावेश आहे. यासाठी तीन टन रांगोळी, १५० किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे. ६० बाय शंभर फूट आकार असलेल्या या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छटा पाहावयास मिळणार आहेत. १४ फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिध्द रांगोळीकार आदमआली मुजावर यांनी रेखाटली आहे. माजी मंत्री, आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते, नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. शहरातील कारसेवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा व दीपोत्सवाचेही आळतेकर हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी २१ रोजी साईनंदन कॉलनीत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दि. २२ रोजी सकाळी श्रीप्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण समारंभ, श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत, तर दुपारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. स्त्रीशक्ती नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.