प्रतिष्ठा न्यूज

माणसे हिच जिवंत मंदिरे आहेत प.पु. परमात्मराज महाराज – ज्येष्ठ पौर्णिमें निमित्त प्रवचन सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सद्धर्माचे आचरण करून अंतःकरणात मानवतेचे मंदिर बांधणे आवश्यक आहे,सत्स्वरूप म्हणजे आत्मतत्व हे विश्वव्यापक चैतन्य एकच आहे.हे धर्माचरणाद्वारे समजून घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले,ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले,धर्माशी अखंड संबंध स्थापित ठेवून जीवनाची वाटचाल करीत राहणे आवश्यक आहे.वसिष्ठ ऋषींच्या उपदेशानुसार अश्वपती राजाने सावित्री मंत्राचा दहा लाख जप केल्यामुळे त्याला मुलगी झाली.सावित्रीदेवीच्या नांवावरून त्या मुलीचे नांवही सावित्री असेच ठेवले. पुढे त्याच सावित्रीने दोन्ही कुळांचा उद्धार केला.आजच्या काळात मुलगी झालीतर काहींना वाईट वाटते. सावित्रीने पतिनिष्ठा ठेवून व पतीसेवा करून मुलगी आणि पत्नी म्हणून ही आदर्श ठेवला आहे. सावित्रीच्या धर्माचरणाचा बोध घेऊन मुलगीला कमी समजू नये.अनेक विभूती होऊन गेल्या.त्यांनी धर्माचरण केले.ते सद्धर्माचरणा संबंधित आदर्श ठरले. धर्मावर विश्वास असल्यास अध्यात्म मार्गाने वाटचाल घडते.महाभारताच्या वनपर्वातील आख्यानात सत्यभामा व द्रौपदी संवादात सत्यभामाने पतीला ताब्यात ठेवण्यासाठी उपाय द्रौपदीकडे विचाराला.तेव्हा मंत्र, वशीकरण,जडीबुटीने पतीला मुठीत ठेवता येत नाही तर पतीसेवा,आणि धर्माचरणाने वागून पतीला आपल्या अनुकूल ठेवता येते असे सांगून उपदेश केला.जीवनात धर्माने वागण्याला फार महत्व आहे.धर्माने वागण्याचे बंधन सर्वांना आहे. अवतारी महापुरुषांनी ही धर्माचरण करून आदर्श स्थापित केला आहे. जनतेकडून धर्मपालन व्हावे यासाठी अवतार होत असतात.कित्येक लोक धर्म वाङ्गमय वाचत नाहीत.माणसाने सुरवातीपासूनच धर्माने वागावे.वाईट वागणाऱ्या व्यक्तीत नंतर जरी सुधारणा झाल्या तरीही काही जुन्या खूणा राहण्याची शक्यता असते. त्याही नको म्हणून लहानपणापासूनच म्हणून धर्माचरणाला अतिशय महत्व आहे.धर्माशी अन्वय कसा साधावा या चिंतनात असावे.क्षूद्र भौतिक स्वार्थासाठी माणूस अधर्माचा मार्ग स्वीकारत असतो ते वाईट आहे.
एक हिंदू राजा जप करत होता.तेथे एक मुस्लीम सूफी साधू आले. त्यावेळी राजाने जप करण्याच्या पद्धतीतील फरका विषयी साधूला विचारले.तेव्हा मणी आत ओढणे म्हणजे चांगले गुण आत घेणे आणि मणी बाहेर ढकलणे म्हणजे वाईट गुण बाहेर ढकलणे.असा चांगला बोध त्या साधूने राजाला केला.यामध्ये समजूतदारपणा महत्वाचा आहे. अन्यथा कलह निर्माण होत असतात. धर्म म्हणजे एखादा सांगडा नव्हे. धर्म जीवंत आहे.धर्माची गूढ रहस्ये समजून घेणे महत्वाचे आहे.तेराव्या शतकात ओडिशातील राजा लांगूलनृसिंह ने सूर्यमंदिर बांधविले. त्यावेळी मंदिराच्या कळशारोहणाचे काम वेळेवर न झाल्यास बाराशे कामगारांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करण्यात आली होती.त्यावेळी सूर्यदेवाने छोट्या धर्मपादच्या रूपात येऊन ते काम पूर्ण केले.व कामगारांचे प्राण वाचविले.कामगारांना मृत्यूदंड जाहीर करून अधर्म केला होता.परंतु सूर्यदेवाने तशी वाईट घटना घडू दिली नाही.त्या राजाने अनेक मंदिरे बांधली. पण धर्मतत्त्व व्यवस्थित समजून घेतले नव्हते.त्यामुळे त्याच्याकडून अपराध घडण्याचा मोठा संभव होता.माणसे हीच जीवंत मंदिरे आहेत.माणसाने माणुसकी सांभाळून सर्वकाही करावे. हिंदू,मुस्लीम,ख्रिश्चन या उपासनेच्या पद्धती आहेत.सद्धर्म एकच आहे. दुसऱ्याचेही चांगले व्हावे,आपलेही चांगले व्हावे ही भावना असावी.खरा धर्म समजून घ्यावा.त्यासाठी परमाब्धि,वर्तेट,सत्पोष,महोन्नय इत्यादी ग्रंथांचे वाचन करावे,असे सांगितले.यावेळी हणबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली.यावेळी बाळासो अर्जुन पोवाडे हणबरवाडी,जगन्नाथ सिध्दू खोत हणबरवाडी,रोहित सुभाष कुंभार तळंदगे,सुरेश बस्तवडे हंचिनाळ,दत्ता कुंभार म्हाकवे आदी देणगीदार तसेच महाराष्ट्र पणन महासंघ मुंबईच्या संचालकपदी निवड झाल्याबदल सौ धनश्रीदेवी धनराज घाटगे यांचा प .पू .परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आडी,बेनाडी, कोगनोळी,हणबरवाडी,हंचिनाळ, सुळकूड,म्हाकवे,आणूर,कागल, निपाणी पंचक्रोशीसह बेळगांव, कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,मुंबई, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सोलापूर,बीड जिल्ह्यातील कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.