प्रतिष्ठा न्यूज

सांगली टिंबर मर्चंटस पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१०: सर्वसामान्य टिंबर व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करुन त्यांना पत देणाऱ्या सांगली टिंबर मर्चंटस नागरी सहकारी पतसंस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात कार्पोरेट लुकची देखणी इमारत उभी केली. संस्था व सभासद हितासाठी पदाधिकारी, संचालक मंडळ व सेवक वर्ग चांगले काम करत आहेत. त्यामुळे संस्थेने ठेवीदार व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. ठेव संरक्षण योजनेची अंशदान रक्कम कमी करणे व पतसंस्थांची थकबाकी कमी होण्यासाठी जिल्हा पतसंस्था फेडरेशनला वसूली अधिकारी नेमण्याचा अधिकार पूर्ववत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी केले. संस्थेने उभी केलेल्या नूतन इमारत पहाणी व संस्था पदाधिकारी व संचालक यांच्याशी संवाद साधून पतसंस्थांच्या अडीअडचणी समजावून घेताना ते बोलत होते.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र तातोबा मुळीक यांनी स्वागत केले. मॅनेजर श्रीकृष्ण मोहिते यांनी प्रास्ताविक केले व संस्थेची माहिती दिली.
यावेळी माजी चेअरमन यशवंत माळी, व्हा. चेअरमन किशोर रामजीभाई पटेल, संचालक अशोक मासाळे, बाबुभाई पटेल, सुरेश चौधरी व राजेंद्र कांबळे, नितीन तावदारे, एम. एन. हुल्याळकर मामा, प्रकाश निकम, आशिष चौधरी आणि सेवक वर्ग उपस्थित होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.