प्रतिष्ठा न्यूज

गणपती उत्सवात अहोरात्र झटलेल्या तासगावच्या विघ्नहर्त्यांना सलाम! पंधरा दिवस ना सुट्टी ना घरची आठवण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहरात अविश्रांत बंदोबस्त ठेवणाऱ्या तासगाव पोलिसांच कौतुक कराव तितकं थोडंच.तुम्ही आहात म्हणून आम्ही हा सण उत्साहात,जल्लोषात साजरा करू शकलो,अशा स्वरूपाच्या असंख्य प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.संपूर्ण गणेशोत्सवात आणि तासगावच्या श्री गणपतीच्या रथोत्सवात २४ तास अविश्रांतपणे बंदोबस्त ठेवनारे पोलिस हे आमचे खरे हिरो आहेत असा सुर नागरिकांच्यातून उमटत आहे.उत्सव काळात दिवस असो वा रात्र,रस्त्यावर खाकीच खाकी दिसत होती.त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती,देखावे पाहण्यासाठी रात्री-बेरात्री फिरताना आपण सुरक्षित आहोत,असा विश्वास सामान्य नागरिकांच्यात मनात निर्माण झाला असल्याचे चित्र उत्सव काळात पहायला मिळाले.गणरायाचे स्वागत म्हणजे सर्वत्र जल्लोष आणि उत्साहाचा माहोल असतो.उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये,याची सर्वाधिक जबाबदारी पोलिसांवर असते.उत्सव सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा दिवसां पासून पोलिस दल सज्ज असते.या उत्सव काळात त्यांच्या रजा,सुट्या बंद केल्या जातात.पोलीस स्वतःच्या घरातील उत्सवाची जबाबदारी कुटुंबातील इतरांवर सोपवून समाजाचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कर्तव्य बजावत होते,त्यांच्या सतर्कते मुळेच गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.