प्रतिष्ठा न्यूज

नाभिक बांधवांनी समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे विनोद माने..तासगावात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिवा शिवा सेना प्रतिष्ठानने सामाजिक जाणिवेतून सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे,चांगल्या कामात अडथळा निर्माण होतो मात्र आपला निर्धार पक्का ठेवा कामकाज पारदर्शक ठेवा,नाभिक बांधवांनी समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे व सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन वीर शिवा काशीद प्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष विनोद माने यांनी केले.तासगाव येथील जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या वतीने तासगाव तालुक्यातील नाभिक समाजातील ग्रामपंचायत,सहकारी संस्थेचे आजी – माजी पदाधिकारी, शासकीय,निमशासकीय नोकरदार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद गायकवाड तसेच पत्रकार सुनील गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी नाभिक समाजातील विविध मान्यवरांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना सुनील गायकवाड म्हणाले,तासगाव शहरातील नाभिक समाजाचे काम आदर्शवत असेच आहे.त्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली आहे.जिवा शिवा सेना प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविलेले उपक्रम स्तुत्य आहेत,त्यास आपले सहकार्य राहील.अध्यक्षस्थानावरून बोलताना विनोद गायकवाड म्हणाले,समाज जर घडवायचा असेल तर सकारात्मक संवाद,योग्य समन्वय आणि परस्पर सहकार्य घडवून आणणे आवश्यक आहे.ते काम प्रतिष्ठान वेगवेगळ्या उपक्रमांतून करीत आहे.सामाजिक बांधिलकीतून लावलेल्या या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं.एक उदात्त हेतू ठेवून प्रतिष्ठान मार्गक्रमण करीत आहे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव यांनी स्वागत केले.उपाध्यक्ष उमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.दत्तात्रय सपकाळ यांनी आभार मानले.कार्यक्रमास राजेंद्र गायकवाड , गणपती क्षीरसागर,शिवाजीराव डांगे , प्रभाकर गायकवाड,सागर गायकवाड,धनाजी जाधव,नंदकुमार जाधव,प्रवीण जाधव,विजय साळुंखे, सुदाम खंडागळे,विष्णू गायकवाड, सोपान गायकवाड,संतोष गायकवाड अन्य समाज बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.