प्रतिष्ठा न्यूज

भीमशक्ती आणि मल्हारशक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रात इतिहास घडेल : प्रकाश आंबेडकर; धनगर समाजाचे शिष्टमंडळाने घेतली भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सकल धनगर समाजाचे शिष्टमंडळ प्रकाश आंबेडकर यांना भेटले. त्यावेळी बाळासाहेबांनी धनगर आरक्षण अंमलबजावणीबाबत धनगर समाजाला पाठिंबा द्यावा अशी सकल धनगर समाज शिष्टमंडळ यांनी त्यांना मागणी केली. त्यांनी त्याबद्दल सखोल चर्चा करून तुमचे जास्तीत जास्त लोक विधानसभेत गेले पाहिजेत तर तुम्हाला लवकर न्याय मिळेल आणि भीमशक्ती आणि मल्हारशक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रात इतिहास घडेल असे सांगितले. त्यावेळी सकल धनगर समाज शिष्ट मंडळाने आमच्या सर्व सदस्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.बाळासाहेबांनी सकल धनगर समाजाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि पूर्ण टीम याना भेटण्यास आमंत्रित केले. त्यावेळी सकल धनगर समाज कोर टीम सदस्य प्रा.कृष्णा आलदर , इंजि.उद्योजक अनिल कोळेकर, उद्योजक तात्यासाहेब गडदे,हे मा.अंकुश पाटील, मा.धनाजी व्हणमने, मा.राजेंद्र दुधाळ, इंजि. सुरेश पांढरे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.