प्रतिष्ठा न्यूज

तासगावमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ..तरुणाईचा मोठा प्रतिसाद…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव :नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीस आज मोठया उत्साहात सुरुवात झाली.तसेच 12 ऑक्टोबरला विजया दशमी दसरा यादिवशी महादौड होऊन सांगता होणार आहे.तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी,हिंदू समाजाच्या मनात राष्ट्रभक्ती धर्म भक्ती जागृत करण्यासाठी दुर्गामाता दौडीची  संकल्पना श्री.भिडे गुरुजींनी मांडून ती अंमलात आणली आहे.नवरात्र उत्सवात आज पासून पुढील आठ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येणार आहे.श्री शिवतीर्थ गुरुवार पेठ येथून पहाटे 6 वाजता ध्वज पूजन करून दौडीस प्रारंभ होत असून,त्या ठिकाणी ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र,म्हणून दौडीस सुरुवात करण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली दुर्गामाता दौड याही वर्षी मोठ्या उत्साहात करण्यात येणार असून शहरातील सर्व हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने करण्यात आले आहे.दसऱ्याच्या दिवशी महादौड होऊन दौडीची सांगता होणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.