प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती अपहार प्रकरणी सचिवांचा आठ दिवसात अहवाल दया,जिल्हा उपनिबंधकांचे तासगावच्या सहाय्यक निबंधकांना आदेश

मनसेच्या अमोल काळे यांचा पाठपुरावा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीत 4.50 कोटी अपहार करणारे सचिव चंद्रकांत हिंदुराव सूर्यवंशी यांना बडतर्फ करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा उपनिबंधकाना केली होती, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.यावर उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी आठ दिवसात अहवाल दया असे आदेश तासगावच्या सहाय्यक निबंधक यांना दिले आहेत.या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा मनसेचे नेते अमोल काळे करत आहेत.
अमोल काळे यांनी दिलेल्या निवेदनात  म्हंटले आहे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बांधकाम 9 कोटी 85 लक्ष 75 हजार शून्य 95 इतक्या रकमेचे झाले आहे,मात्र बाजार समितीने 4 कोटी 51 लाख 87 हजार 916 रुपये इतकी जादा रक्कम ठेकेदाराला अदा करीत मोठा अपहार केला आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून याप्रकरणी 34 जणांना विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी नोटिसा पाठवल्या आहेत.यात तत्कालीन सभापती,उपसभापती, संचालक व सचिव यांचा समावेश आहे.मात्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव या पदावर कार्यरत असणारे चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासमोर हा सर्व अपहार झाला आहे.
तसेच या अपहारात यांचा प्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.या अपहाराच्या माध्यमातून भरमसाठ संपत्ती त्यांनी गोळा केली आहे.तसेच शासकीय कामात कुचराई केली आहे, तरी या सर्व प्रकाराची दखल घेऊन सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करून व शासनाच्या अपहारात सहभागी असल्या कारणे सूर्यवंशी यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ ची कारवाई करा,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलनाचा इशारा दिला होता.याची तात्काळ दखल घेत उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांचा आठ दिवसात अहवाल दया असे आदेश तासगावच्या सहाय्यक निबंधक यांना दिले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.