प्रतिष्ठा न्यूज

विक्रम काळे यांचा “विक्रमी विजय” सलग चार वेळा बनले मराठवाड्याचे आमदार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम वसंतराव काळे हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला आहे.
विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची 20 हजार 78 मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना 13 हजार 489 मते मिळाली. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी 13 हजार 543 मते मिळविली. त्यांनी भाजप उमेदवार किरण पाटील यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची 54 मते अधिक घेतली. विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन हजार 485 मते बाद झाली. महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपच्या किरण पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच आघाडी मिळविली. मतमोजणी अखेर महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे चौथ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांनी भाजप युतीचे उमेदवार किरण पाटील यांचा 6 हजार 937 मतांनी पराभव केला. काळे यांना एकूण 25 हजार 380 तर किरण पाटील यांना 16 हजार 683 मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सुर्यकांत विश्वासराव हे होते. त्यांना 14 हजार 128 इतकी मते मिळाली. इतर कोणत्याही उमेदवाराचा प्रभाव निवडणुकीत जाणवला नाही. एकूण 14 उमेदवार या निवडणुक रिंगणात होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या सुर्यकांत विश्वासराव यांना अनपेक्षितपणे लक्षवेधी मते मिळवली आणि दुहेरी वाटणारी लढत तिरंगी झाली. भाजपने पुर्ण शक्तीपणाला लावून देखील किरण पाटील मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. राष्ट्रवादीकडून बंडखोरी केलेले प्रदीप सोळंके, भाजपचे नितीन कुलकर्णी हे पुर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत. विक्रम काळे यांनी या मतदारसंघातून विक्रमी असा हा सलग चौथा विजय मिळविला आहे. यापूर्वी विक्रम काळे यांचे वडील वसंतराव काळे यांनीही एक वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला होता. वसंतराव काळे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा तर शिक्षक मतदारसंघातून एक वेळा विजयी होऊन विधानपरिषदेत पोहोचले होते. विक्रम काळे यांनी
एकप्रकारे आपल्या वडिलांचाच विक्रम मोडून काढला आहे.त्यांच्या विजयाबद्दल जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.