प्रतिष्ठा न्यूज

कॉग्रेस आणि भाजपा विदर्भ विरोधी : वर्धा येथील पत्रकार परिषदेत ॲड. वामनराव चटप यांचे टिकास्त्र

प्रतिष्ठा न्यूज
वर्धा प्रतिनिधी : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथुन निघालेली विदर्भ निर्माण यात्रा वर्धा शहरात दाखल झाली असून स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृह कारला चौक येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना कॉग्रेस आणि भाजपा हे विदर्भ विरोधी असुन हे कधीही स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ देणार नाही म्हणून विदर्भातील जनतेने पेटुन उठावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ निर्माण यात्रा काढली असुन ही यात्रा विदर्भातील ७० तालुक्यातुन जनजागृती करत दिनांक ०५/०३/२०२३ ला संविधान चौक नागपूर येथे जाणार असून तिथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढील आंदोलनाची रणनीती जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले….
या पत्रकार परिषदेला जेष्ठ विदर्भवादी पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुमवार, शेतकरी नेत्या माजी आमदार सौ.सरोजताई काशिकर, स्वतंत्र भारत पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मधुसुदन हरणे, जेष्ठ विदर्भवादी चितले गुरुजी, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर भांदककर, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे प्रदेश सहसचिव सचिन डाफे, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश ठाकुर, पांडुरंग भालशंकर, धोंडबाजी गावंडे, प्रभाकर झाडे,सुभाष बोकडे, पंकज साबळे, प्रशांत तागडे व कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.