प्रतिष्ठा न्यूज

सांगलीमध्ये रंगणार मराठा प्रिमियर लिगचा थरार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. ११ : सांगलीमध्ये प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा प्रिमियर लिगच्या पहिल्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ४ एप्रिल २०२३ ते ९ एप्रिल २०२३ रोजी या लिगमीर्फत होणार्या भव्य हाप पीच डे नाईट क्रिकेट सामन्याचे उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज मराठी प्रिमियर लिगच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सदर सामने तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी होणार असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस २ लाख द्वितीय क्रमांक दिड लाख, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक चे बक्षीस हे ५० हजार रुपये असेल व सर्वांना चषक दिले जातील. या लिगमध्ये होणार्या सामन्यांमध्ये सोळा संघ सहभागी होणार आहेत. सदर सामन्यांमध्ये मराठा समाजाच्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व युवा मराठा वर्ग एकत्रित येणार आहे.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना सहभागी होण्यासाठी मराठा समाज सांगली येथून फार्म घेवून ते भरून द्यावे लागणार आहेत. जास्तीत जास्त पाचशे खेळाडूंचे फॅार्म स्विकारून त्या खेळाडूंना लिलाव पद्धतीने टिक मध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. हा लिलाव रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी मराठी समाज सांगली येथे होणार आहे. या लिगच्या १६ ही संघासाठीचे संघमालक निश्चित झालेले आहेत.

सदर पत्रकार परिषदेस श्री अभिजीत पाटील अध्यक्ष मराठा समाज सांगली, ॲड. अमित शिंदे, श्री शितल बाबर, नगरसेवक युवराज बावडेकर, पै. गौतम भैय्या पवार, नगरसेवक मयूर पाटील, पैलवान छोटू सावर्डेकर, शंभोराज काटकर, नगरसेवक रणजित सावर्डेकर, जयवंत सावंत, रविंद्र खराडे, विलास देसाई, महेश सावंत, सतीश जगदाळे रोहन भोसले, विजय साळुंखे, शरद देशमुख, राहूल भोसले, रुपेश मोकाशी व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.