प्रतिष्ठा न्यूज

मिरज येथे महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावरील जनजागृतीपर सवांद कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अंतर्गत श्री रेणुका कला, क्रिडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज यांच्या सहकार्याने *महिलांचे मानसिक आरोग्य* या विषयावर जनजागृतीपर सवांद कार्यक्रम मिरज येथील कैकाडी वस्ती मध्ये पार पडला.

यात प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून मा सौ प्रेमा संकपाळ, (समुपदेशक, सिव्हिल हॉस्पिटल,सांगली ) आणि मा सौ सीमा सावंत (STD समुपदेशक, सिव्हिल हॉस्पिटल,सांगली) हे उपस्थित होते.
यात कैकाडी वस्तीमध्ये भाजीपाला विकणाऱ्या, घरकाम आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांना मानसिक आरोग्य
यावर मार्गदर्शन करताना मा सौ प्रेमा संकपाळ यांनी शरीरिक आरोग्याबद्दल सवांद साधला. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तर कोणताही संसर्गजन्य आजार पसरणार नाही तसेच रोजच्या आहारात सकस भाजीपाला, कडधान्य आणि फळांचा समावेश करावा ज्यामुळे आपल्याला लागणारे अ,ब,क, ड ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात मिळतील व दैनंदिन हलका व्यायाम सुद्धा करावा आणि कोणत्याही साधारण आजाराकडे दुर्लक्ष न करता लगेच वैद्यकीय उपचार घ्यावा यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल कडून आपणास आम्ही सर्वतोपरी मदत करू असे सांगितले.

यानंतर मा सौ सीमा कांबळे ( STD समुपदेशक, सांगली सिव्हिल हॉस्पिटल, सांगली ) यांनी *महिलांचे मानसिक आरोग्य* या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की सध्या मोबाईल आणि टी. व्ही. मुळे कुटुंबातील सवांद हरवत चालला आहे. यासाठी कुटुंबातील सदस्यासोबत सातत्याने सकारात्मक सवांद ठेवल्यास घरचे वातावरण नेहमी आनंदी राहते. आणि त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो. घरात एकमेकांशी भांडणे, चिडणे असे करण्यापेक्षा नात्यातील गोडवा राहण्यासाठी एकमेकांना समजून घेऊन राहिल्यास कुटुंब आनंदी बनते असेही त्या म्हणाल्या.

यानंतर प्रमुख अतिथी म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक मा प्रज्योत ढाले यांनी महिलांना उद्योजक बनण्यासाठी व आर्थिक उन्नती करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

तसेच श्री रेणुका मंडळ मिरज चे संस्थापक अध्यक्ष श्री परशुराम कुंडले यांनी महिलांना शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी महिलांनी बचत गटातून विविध उद्योग करण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सुरुवात विभावरी आणि त्यांच्या टीम यांनी स्वागत गीत म्हणून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अंतर्गत MSW चे शिक्षण घेत असलेले मा प्रसाद कुंडले यांनी केले तर पाहुण्यांचा परीचय मा सौ गायत्री फडणीस (विद्यार्थिनी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ) यांनी करून दिला.सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सावित्रीबाई फुले यांचे विचार सांगणारे पुस्तकं आणि गुलाबपुष्प देऊन केले.

पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर
महिलांनी प्रश्नोत्तरेच्या माध्यमातून आरोग्याविषयक अडचणी सांगितल्या व पाहुण्यांनी त्यांचे शंका निरसन केले.

यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते व श्री रेणुका मंडळ संस्थेचे सचिव श्री. युवराज मगदूम यांनी मानले.
शेवटी सर्वाना नाश्ता व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्थानिक सौ शोभा जाधव आणि सौ रुपाली माने मॅडम यांनी सहकार्य केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.