प्रतिष्ठा न्यूज

मारतळा-हाळदा मार्गावरील गोळेगाव येथे बसची मोटारसायकलला समोरासमोर धडक तरुण जागीच ठार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : टेंभुर्णीहुन‌‌ नांदेडकडे ‌जाणाऱ्या राज्य ‌ परिवहन महामंडळाच्या ‌बसने‌ ‌मोटारसायकल स्वारास गोळेगाव (तप) येथे समोरासमोर जोराची धडक दिल्याने तो तरुण जागीच ठार झाल्याची घटना दि.27 मार्च 2023 रोजी दुपारी 12:15 दरम्यान घडली आहे. कंधार तालुक्यातील दहीकळंबा येते नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी जात असतांना मारतळा – हाळदा या मार्गवर ही घटना घडल्याने अंतर्गत पोलीस स्टेशन उस्माननगर येते बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
उस्माननगर पोलीसांनी ‌दिलेल्या माहिती अशी की, राजेश्वर बालाजी गंगातीरे‌- वय‌ 25 वर्ष ‌रा‌हणार ताकबिड‌ ता‌.नायगाव‌. येथील असून नांदेड येथून आपल्या आईला मोटारसायकल वरून आपल्या आजोळी‌ लोहा तालुक्यातील उमरा‌, येथे सोडून परत नांदेडकडे निघाला होता मात्र दहीकळंबा‌ येथे त्याच्या नातेवाईकाचे लग्न होते. तेंव्हा ‌आपण लग्न सोहळ्यात जावे म्हणून तो परत मारतळा- हाळदा मार्गाने आपली मोटारसायकल क्रमांक- एम‌.एच‌.26-व्हि‌.आर‌.1532 वरून दहिकळंबा कडे निघाला असताना गोळेगाव (तप) जवळ नांदेड आगाराची टेंभुर्णीहून‌ नांदेडकडे येणारी बस क्रमांक- एम‌.एच‌.20 बि‌.एल‌.1649 या भरधाव बसने‌ राजेश्वर गंगातीरे‌ या तरुणाच्या‌ मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली असता या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- पांडुरंग भारती, पीएसआय- सुनील पल्लेवाड, जमादार- रंगनाथ भारती यांनी अपघात स्थळी भेट देत पंचनामा करून प्रेत उत्तरीय‌ तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. या प्रकरणी बस चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात चालू होती. मयत‌ तरुण राजेश्वर हा‌‌ ‌नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या संकल्प हेअर कटिंग सलून मध्ये रोजंदारीवर काम करत होता. दुर्दैवाने राजेश्वरला‌ काळाने गाठले व‌ भरधाव बसच्या धडकेत तो जागीच ठार झाला. ही‌ माहिती आई व नातेवाईक कळताच घटनास्थळी जमा झाले व एकच हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू झाला. मयत‌ राजेश्वर हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील,1भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. राजेश्वरच्या अपघाती निधनाने कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्याने गंगातीरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
●आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत- प्रतिष्ठा न्युज💐

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.