प्रतिष्ठा न्यूज

शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुलीच्या नावावर 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी : महेश खराडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली /प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शेतकरी मुलाच्या लग्नाची बिकट सामाजिक समस्या बनली आहे. शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुली च्या नावावर 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी या मागणीसह ही सामाजिक समस्या ऐरणीवर आणण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले सद्या शेतकरी नवरा नको ग बाई हेच सर्वत्र ऐकायला मिळते शेतकरीही आपली मुलगी शेतकरी मुलाला देण्यास तयार नाही मुलगा शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी नकोच हे तरुण मुलींनीही ठरवून टाकले आहे
या मानसिकतेमुळे प्रत्येक गावात किमान 40 ते 50 मुले बिन लग्नाची आहेत चाळिशी पार केलेली मुले लग्न कधी होणार या विवचानेने ग्रासलेले आहेत त्याचे कुठे कामात लक्ष नसते त्याच्यात चिडचिड पणा वाढलेला आहे काहीजण मनोरुग्ण झालेलेआहेत
याला कारण आहे शेती मधील बे भरवशाचे उत्पन्न , शेतीमालाला हमी भाव नाही कमी व्याज दराने कर्ज पुरवठा नाही हमखास बाजार पेठ नाही शासकीय धोरणे शेतकरी हिता अवजी मध्यम वर्गीय ग्राहक हिताची आहेत हाडांची काद आणि रक्ताचे पाणी करून शेती माल पिकवला तरी तो योग्य भावात विकेल याची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही त्यामुळे शेती करणे म्हणजे जुगार खेळणे झाले आहे जे आपण भोगतोय ते आपल्या मुलीच्या वाट्याला येवू नये ही भावना शेतकरी बापाची झाली आहे बापाचे दारिद्र्य , घर चालवताना बापाची होत असलेली तारा बळ ती बघत असते त्यामुळे तीही शेतकरी नवरा करण्यासाठी उस्तुक नाही त्यामुळेच शेती करणाऱ्या मुलाचे विवाह होत नाहीत ही समस्या आर्थिक आणि सामाजिक आहेत शेतीचे अर्थकारण सुधारले तर ही समस्या चुटकी सर्शी सुटेल मात्र त्याला सर्व राजकारणी मंडळींनी मतावर डोळा न ठेवता शेतीची धोरणे ठरविली पाहिजेत त्याच बरोबर शेतकरी मुला बरोबर लग्न करणाऱ्या मुलीक्या नावावर 10 लाख तर मुलीच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव ठेवावी किमान त्यामुळे काही मुली शेतकरी नवरा करायला तयार होतील तर काही बाप शेतकरी जावई करायला तयार होतील लग्न हा विषय वैयक्तिक असला तरी तो सामाजिक आणि आर्थिक बनला आहे त्यामुळेच आम्ही या मागण्यासह या विषयाकडे समाज आणि राज्यकर्त्यांच्या लष्य वेधण्यासाठी लवकरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार आहोत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.