प्रतिष्ठा न्यूज

सांगली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत सांगली शहर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद टिफिन बैठक उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत सांगली आमराई उद्यान येथे कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद व टिफीन (स्नेहभोजन) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार सुधीर गाडगीळ व शेखर इनामदार यांनी चक्क संतरजा उचलल्या व परिसरात स्वच्छता हि केली यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की. सर्व कार्यकर्त्यांनी घरातुन डबे आणले व सर्वत्र जेवले यांचा आनंद झाला. महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद व टिफिन बैठक भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केली जात आहे. याच धरतीवर सांगलीमध्ये भाजपाचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ही टिफिन बैठक आमराई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सर्वांना उद्देशून आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी पुढील निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे व आपल्या पक्ष असाच पुढे आणावा याचे आवाहन केले व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत जो विकास केला त्याची माहिती आ.सुधीर गाडगीळ यांनी दिली. सर्व पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपल्या घरातून जेवणाचे डबे आणून ही टिफिन बैठक उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. यावेळी सर्वांनी एकमेकांना आपल्या डबातील जेवण वाटून आमराई उद्यान मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आमदार गाडगीळ आणि स्वतः प्रत्येकांना आग्रह करून जेवण वाढले व ही बैठक पार पडली.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी केले तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे व विधानसभा प्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनेची माहिती व मार्गदर्शन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले या संवाद व टिफिन बैठकीसाठी माजी आमदार नितीन राजे शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर, सभापती धीरज सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे, प्रदेश अल्पसंख्यांक सचिव अश्रफ वांकर, नगरसेवक युवराज बावडेकर सुबराव तात्या मद्रासी, गजानन मगदूम, राजेंद्र कुंभार, पांडुरंग कोरे प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, प्रकाश बिर्जे, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, नगरसेविका अनारकली कुरणे, सविता मदने, कल्पना कोळेकर, सोनाली सगरे, नसीमा शेख, गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, किरण भोसले, विश्वजीत पाटील दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, अतुल माने, रोहित जगदाळे, सुरज पवार, चेतन माडगूळकर, शैलेश पवार, उदय मुळे, पापा बागवान, प्रियानंद कांबळे, बाळासाहेब पाटील, बंडू सरगर, गणपती साळुंखे, पृथ्वीराज पाटील, सचिन बालनाईक, शितल कर्वे, गौस पठाण, प्रफुल ठोकळे, अमित गडदे, प्रसाद वळकुंडे, भालचंद्र साठे, क्युम शेख, धणेश कातगडे, माधुरी वसगडेकर, हेमलता मोरे, प्रीती मोरे, छायाताई सर्वदे छायाताई हाक्के, शैलजा पंडित, अश्विनी तारळेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ व शेखर इनामदार यांनी चक्क संतरजा उचलल्या व परिसरात स्वच्छता केली .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.