प्रतिष्ठा न्यूज

विसापूर ग्रामपंचायत टाकाऊ प्लास्टिक विकत घेणार : सरपंच अशोक मोहिते

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : विसापूर (तासगाव )येथे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी टाकाऊ प्लास्टिक ग्रामपंचायत खरेदी करणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याचे सरपंच अशोक मोहिते यांनी सांगितले.महिलांच्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय त्यांनी जाहीर केला.या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.प्लास्टिक कॅरीबॅग,पाणी बाटल्या ह्या रस्त्यावर गटारीत पडून गटारी तुंबत आहेत,त्यामुळे रोगराई पसरून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे ग्रामपंचायतीने घरात वापरलेलं टाकाऊ झालेलं सर्व प्रकारचे प्लास्टिक नाममात्र दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.गावातील लोकांना प्लास्टिक रस्त्यावर अथवा गावात कुठेही न टाकता ग्रामपंचायतिला दयावे, त्यामुळे गाव स्वच्छ राहण्यास मदत होईल असे आवाहन सरपंच अशोक मोहिते यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.