प्रतिष्ठा न्यूज

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती तासगाव तालुका अध्यक्षपदी सुशांत माने यांची निवड; सांगली जिल्ह्यात पाचशे ठिकाणी एकाच वेळी अण्णाभाऊंची जयंती साजरी करणार – कुलदीप देवकुळे

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे कार्य वैश्विक आहे. अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाला शोभेल अशी सांगली जिल्ह्यात एकाच वेळी पाचशे ठिकाणी जयंती साजरी करणार असल्याचे देवकुळे यांनी सांगितले.
तासगाव येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. राम कांबळे होते.
यावेळी तासगाव तालुक्यातील गोर गरीब, मागासवर्गीयांच्या अडचणी, प्रश्न समजून घेण्यात आले. त्यानंतर तासगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तासगाव तालुका अध्यक्षपदी सुशांत माने यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर, उपाध्यक्षपदी राकेश देवकुळे तर तासगाव शहर अध्यक्षपदी रोहीत वासनिक यांची निवड करण्यात आली.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रमोद रास्ते, प्रा. लक्ष्मण मोरे, प्रशांत सदामते, प्रशांत आवळे, अमित कांबळे, आबा सुवासे, आकाश लोंढे, प्रथमेश देवकुळे, आकाश कांबळे, विक्रम मोहिते, यांच्यासह तासगाव तालुक्यातील चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थि होते. शेवटी आभार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे (मेजर) यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.