प्रतिष्ठा न्यूज

विसापूर येथे कायदे विषयक शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विसापुर येथील विष्णू मंदिर येथे आज कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.यावेळी तासगाव न्यायालयाचे न्यायाधीश ओ.एम.माळी यांनी मार्गदर्शन केले.तासगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. बी.डांगे  सांगली बार असोसिएशनचे ऍडव्होकेट फारूक  कोतवाल,ऍड विक्रांत वडेर,तासगाव बार असोसिएशनचे ऍड एस.एस.कणसे,ऍड जे.एस.भोसले,बी बी जाधव,तसेच लॉ चे विद्यार्थी यांनी यावेळी कायदे विषयक मार्गदर्शन केले.यावेळी तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पाटील,जिल्हा परिषदेचे सदस्य अर्जुन पाटील,माजी सरपंच बळवंत(तात्या) चव्हाण,तंटामुक्ती अध्यक्ष संपत माने, तासगाव सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष दिलीप माने,सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर, ग्रामसेवक एम झांबरे साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य,रा.शा.माने पाटील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक, हायस्कूलचे विद्यार्थी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी,विसापूर गावातील सन्माननीय ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व महिला उपस्थित होत्या.आभार सरपंच अशोक मोहिते यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.