प्रतिष्ठा न्यूज

खा. राहुल गांधी यांची नांदेड येथे उद्या गुरूवारी ऐतिहासिक सभा : कडेकोट पोलीस बंदोबस्त; भारत जोडो यात्रेत लाखो लोक सहभागी होणार

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.9 : शहरातील नवा मोंढा मैदानावर सायंकाळी ठीक 6:00 वा. काँग्रेस पक्षाचे युवा नेते,खा.राहुल गांधी यांची ऐतिहासिक सभा होणार आहे. या सभेसाठी नांदेड नगरी सज्ज झाली असून पोलीसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे.
भारत जोडो यात्रा गुरुवार दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 5:45 वाजता कापसी गुंफा येथून पदयात्रेस प्रारंभ होणार आहे. यात्रा दुपारी चंदासिंग कार्नर येथे पोहचेल. त्यानंतर वेळ राखीव राहणार आहे.तसेच यात्रेचे दुपारी 3:00 वाजता देगलूर नाका येथे आगमन होणार आहे. सायंकाळी ठिक 5: वाजता ऐतिहासिक जाहीर सभा होणार आहे.

या भारत जोडो यात्रेत काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री एच.के.पाटील,संपतकुमार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जेष्ठ नेते श्री नाना पटोले, माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण,जेष्ठ नेते माजी मंत्री,खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री श्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजुरकर, आ.मोहणराव हंबर्डे, माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, आ.माधवराव पाटील पवार, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आ. जितेश अंतापूरकर, श्री रवींद्र पाटील चव्हाण,श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉ. मिनल पा. खतगावकर, महापौर जयश्री निलेश पावडे आदी मान्यवर यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत.
या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड शहर आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
यात्रेतील बहुतांश यात्रेकरूंना ओळखपत्र देण्यात आली आहेत. तसेच यावेळी पोलीसांचा मोठा फौजफाटा, बंदोबस्त राहणार आहे. तरी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.