प्रतिष्ठा न्यूज

कलाकारांनी आपल्या कलेतून मानवता जपावी : डॉ. श्रीपाद देसाई

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच मानवता जपली पाहिजे. सामाजिक जाणीव ठेऊन परिश्रम घेणारा कलाकार कलेच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवतो. कोल्हापूर ही कलेची नगरी आहे. चित्रपट क्षेत्राला अनेक मोठे कलाकार कोल्हापूरने दिले आहेत. कलेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी मोठया प्रमाणात संध्याही उपलब्ध आहेत असे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई यांनी केले ते निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने अभिनय चित्रपट व नाटक निर्मितीची प्राथमिकता या विषयावर शनिवार दि. 4 मार्च 2023 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय अभिनय कार्यशाळेत बोलत होते.
या कार्यशाळेत दिग्दर्शक अनिल म्हमाने, सहदिग्दर्शक अशोक कांबळे, सिनेअभिनेते सुनिल कांबळे, सुहास बोधे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व तज्ज्ञ मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत चित्रपट व नाटक निर्मिती प्राथमिकता, अभिनय, गायन व नृत्याची प्राथमिकता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस डॉ. शोभा चाळके, डी. एन. नांगरे, छाया पाटील, राहुल काळे, अरहंत मिणचेकर, धनश्री नाझरे, सनी येळावकर, नितेश उराडे ॲड. शीतल देसाई, शिवम बोधे यांच्यासह मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.