प्रतिष्ठा न्यूज

उमरा-मारतळा परिसरात विज- वादळीवारा व जोराच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा – मारतळयासह परिसरात दि.16 मार्च 2023 रोज गुरुवारी दुपारी वादळी वारा विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाल्याने काढणीला आलेला गहू, टाळकी ज्वारी व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतात असलेली जनावरे,पशु, गारा व वीज पडून मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत.


सध्या हवामान खात्याने व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजाने शेतकरी काळजीत होते.शेत शिवारात मागील दोन दिवसापासून पीक काढणे व मळणीसाठी धावपळ सुरू होती. कांही शेतकऱ्यांनी काढणी करुन गव्हू, हरभरा, टाळकी ज्वारी गोळा झाकून ठेवली होती परंतु या जोराच्या वादळामुळे झाकून ठेवलेल्या ताडपत्री उडून गेल्यामुळे पाण्याने भिजून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात उमरा, गोळेगाव, कापशी बु. व खु. मारतळा, कामळज, कौडगाव, नांदगाव, चिंचोली, वाका, धनंज बु.व खु. जोमेगाव, व 5 तांडे, परिसरात अचानक विजासह वादळ व पाऊस झाला. तर धनंज बु. येथे विज पडून माधव काशीराम शिंदे यांच्या शेतातील आख्याडावर एक बैल ठार झाला आहे.कापशी बु शिवारात विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर मारतळा- वाळकी बु. शिवारात जोराच्या गारा पडून एका शेतकऱ्याच्या आखाड्यावरील 40 गावरान कोंबड्या मृत्यु झाल्या आहेत.आदीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या नुकसानी मुळे पूर्ण धास्तावला आहे तेंव्हा प्रशासनाने या नुकसानिणीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत असून या बाबीकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.